Latest

नौदलातील काही शाखांमध्ये महिलांना प्रवेश; केंद्राची दिल्ली हायकोर्टात माहिती

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नौदलातील काही शाखांमध्ये आता महिलांना प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती केंद्र सरकारने आज (दि.१६) दिल्ली उच्च न्यायालयात दिली. भारतीय नौदल विद्यापीठ प्रवेश योजनेच्या जनरल सर्व्हिस एक्स केडर, आयटी तसेच इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रिक शाखांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

नौदलाच्या विविध शाखांमध्ये महिलांची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, अशा विनंतीची याचिका ॲड. कुश कालरा यांनी दाखल केली होती. केंद्र सरकारने दिलेली माहिती विचारात घेउन मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली. ॲड. कालरा यांची याचिका विचारात घेण्यासारखी नाही, कारण याआधीच नौदलातील विविध शाखांमध्ये महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी सुनावणीदरम्यान केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT