Latest

मुंबईतील जोगेश्वरीत इमारतीवरील लोखंडी रॉड रिक्षावर कोसळून महिला ठार; चिमुकली गंभीर

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जोगेश्वरी मुख्य गुंफा रोडवरील एआयएम ग्रुपचे विकासक मलकानी डेव्हलपर्सचे इमारतीचें बांधकाम सुरू आहे. दरम्यान या इमारतीवरील लोखंडी रॉड रिक्षावर कोसळून एका महिलेचा जागेवर मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. महिलेसोबत रिक्षामध्ये असलेली लहान मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे.

जोगेश्वरी येथील मुख्य गुंफा रोडवर एआयएम ग्रुपचे विकासक मलकाने डेव्हलपर्स यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकाम सुरु असणाऱ्या इमारती खाली एक रिक्षा उभी होती. या रिक्षामध्ये एक महिला व तिची मुलगी मागे बसलेले होते. दरम्यान बांधकाम करण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी रॉड इमारतीवरुन रिक्षावर कोसळला. रॉड इमारतीवरून रिक्षावर कोसल्यामुळे मागे बसलेली महिलेच्या डोक्यात रॉड कोसळल्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांसह जोगेश्वरी पोलिसांनी लहान चिमुकलीला पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT