Latest

महिलेकडून गुप्तांगाद्वारे 20 लाख 30 हजाराच्या सोन्याची तस्करी, पुणे कस्टम विभागाची मोठी कारवाई

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दुबईवरून विमानाने पुण्यात येताना चक्क एका महिलेनी तिच्या गुप्तांगामध्ये तब्बल 20 लाख 30 हजार रूपयांच्या किमतीचे 423.41 ग्रॅम सोने तस्करी करून आणल्याचा धक्कादायक प्रकार सीमा शुल्क विभागाने (कस्टम) उघड केला आहे. याप्रकरणी एका 41 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी एक प्रवासी महिला स्पाईसजेट या विमानाने दुबई ते पुणे असा प्रवास करत होती. यावेळी पुणे विमानतळावर आल्यानंतर तपासणी करणार्‍या कस्टमच्या अधिकार्‍यांना तिची हालचाल थोडी संशयास्पद वाटली. तपासणीसाठी असलेल्या ग्रीन चॅनेलमधून ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या शरीरात तीने काही तरी लपवून आणल्याचे त्यांना आढळले. यावेळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने तेथील महिला अधिकार्‍यांना गुप्तांगात लपवून आणलेल्या सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या. अधिक तपासणीसाठी तिला रूग्णालयात नेऊन तिचा एक्सरे देखील घेण्यात आल्या. परंतु, तिने तिच्या जवळील उपलब्ध असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या होत्या. या महिलेने तिच्या बरोबर 423.41 ग्रॅम वजनाचे तब्बल 20 लाख 30 हजारांचे सोने लपवून आणल्याचे कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT