Latest

Winter Diet: हिवाळा उबदार करण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ हवेच

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्‍यात थंडीची चाहूल लागली आहे.  हवामानात बदल व्हायला सुरूवात झाली आहे. हवामानातील बदलानुसार शरीरातही बदल होतात. त्वचा कोरडी पडणे किंवा फुटणे, कमी तहान लागणे किंवा भूक जास्त लागणे यांसारखे वरकरणी बदल जाणवू लागतात. हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आपल्या शरीरात अंतर्गत बदल देखील होतात. या बदलांचा सामना करण्यासाठी आपला आहारही (Winter Diet) तसाच हवा.

इतर ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यामध्‍ये अन्नपचन चांगले हाेते. त्यामुळे वारंवार भूकही लागते. हा ऋतू जसा शारीरिक कवायतींसाठी उत्तम असतो, तसा पचनासाठी देखील उत्तम असतो. त्यामुळे या काळात तुमचे वजन देखील वाढू शकते. त्यामुळे हिवाळ्यात उबदार पदार्थांचा आहारात (Winter Diet) समावेश करणे; हे गरजेचे असते.

 Winter Diet: हिवाळ्यात आहारात बदल आवश्‍यकच

  • हिवाळ्यातीत थंड पाण्याऐवजी साधे, गरम किंवा कोमट पाणी, सूप, ग्रीन टी असे शरीराला गरमपणा देणा-या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
  • या दिवसांमध्‍ये त्वचा कोरडी पडते. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणी यांसारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश असावा.
  • तेल- तुपासोबतच खोबरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया याचाही आहारात समावेश करावा.
  • साखरेऐवजी शुद्ध आणि सेंद्रिय मध वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास चांगली मदत होते.
  • या ऋतुत आवळा मुबलक भरपूर प्रमाणात मिळतो. यात सी जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. पचन चांगले होण्यास आणि केस आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते, म्हणून आहारत आवळा लोणचे, आवळा कँडी, आवळ्याचा चुंदा, आवळारस यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.
  • हिवाळ्यात अनेक ताज्या पालेभाज्या, फळे बाजारात येतात. आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या आणि संत्री, मोसंबी, गाजर आणि इतर फळांचा समावेश करावा. यामध्ये शरीराला आवश्यक जीवनसत्त्व सी आणि अ हे अधिक प्रमाणात असतात.
  • हिवाळ्यातील दिवसात हरभरा, हुरडा, हिरवे वाटाणे, गाजर, स्ट्रॉबेरी, तुती अशा अनेक ताज्या पदार्थ घटकांची बाजारात रेलचेल असते. तेव्हा यातील अधिकाधिक पदार्थाचा आहारात समावेश करणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.
  • हिवाळ्यात उबदार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सूप आहारात समावेश करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये आपण टोमॅटो, व्हेजिटेबल, कडधान्याचे सूप आहारात घेऊ शकतो. जेव्हा आपण सूप बनवतो तेव्हा यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या वापरतो. ज्या शरीराला आतून उबदार ठेवतात. त्यामुळे या सीजनमध्ये गरमागरम आहारात सूपचा समावेश करणे आरोग्यदायी ठरते.

हे देखील लक्षात ठेवाच

  • या दिवसांत पचनसंस्था वेगाने काम करत असते. त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागते. म्हणून जंक किंवा फास्ट फूडवर भर न देता घरी तयार केलेले पदार्थच पोटभर खाणे पसंत करावे. ज्यांचे वजन कमी आहे, त्यांच्यासाठी वजन वाढविण्यासाठी उत्तम काळ मानला जातो.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT