Latest

David Warner : पाकविरुद्धच्या कसोटीनंतर पुढील वर्षी निवृत्त होणार

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्हीही संघांतील खेळाडू या बहुचर्चित सामन्याच्या सरावात व्यग्र आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा वन-डे विश्वचषक वॉर्नर खेळणार आहे; पण 36 वर्षीय खेळाडूने जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे घरच्या मैदानावर होणारा कसोटी सामना खेळल्यानंतर निवृत्त होणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानविरुद्धचा कसोटी सामना आपला शेवटचा सामना असेल, असेही त्याने सांगितले आहे. (David Warner)

मला धावा करायच्या आहेत. मी नेहमीच सांगितले आहे की, 2024 चा टी-20 विश्वचषक हा माझा अंतिम सामना असेल. मी निश्चितपणे सांगतो की, मी जर आगामी विश्वचषकात धावा केल्या, तर मी ऑस्ट्रेलियात खेळणे सुरू ठेवले तरी मी वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका खेळणार नाही, असे डेव्हिड वॉर्नरने शनिवारी सांगितले. (David Warner)

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT