Latest

आर्यन खानच्या क्लीन चीटनंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चीट मिळाल्यानंतर या प्रकरणाची पूर्वी चौकशी करणारे अधिकारी समीर वानखेडे आता निशाण्यावर आलेले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा तपास अत्यंत खराब असल्याचे सांगितले आहे. त्यावरून वानखेडे यांच्यावर योग्य कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकारने पूर्वीदेखील कारवाई केलेली आहे. सरकारी सूत्रांकडून माहिती मिळत आहे की, सरकार क्रूज ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीनंतर आर्यन खानला दिलेल्या क्लीन चीटनंतर आता समीर वानखेडे यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे. वानखेडे यांनी एसीबीच्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी केलेली होती. ती अत्यंत अयोग्य असल्याचा ठप्पा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एजन्सीला वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्याची आदेश दिले.

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (Cruise drug bust cas) आर्यन खान याला एनसीबीने (NCB) क्लीनचिट दिली आहे. NCB ने सादर केलेल्या आरोपपत्रात पुराव्याअभावी आर्यनच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही. आर्यन आणि मोहक वगळता सर्व संशयितांकडे अमलीपदार्थ आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत एनसीबीने प्रसिद्धी पत्रक जारी करुन माहिती दिली आहे. १४ जणांविरुद्ध NDPS कायद्याच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल (Operations) संजय कुमार सिंह यांनी म्हटले आहे.

आर्यनला गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छाप्यानंतर अटक करण्यात आली होती. अटकेच्या २५ दिवसांनंतर त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास NCB मुंबईने केला होता. पण नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यात आला होता. SIT ने या प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठ पद्धतीने केला.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या मोहक जैस्वाल याला विशेष न्यायालयाने गेल्या नोव्हेंबरमध्ये जामीन मंजूर केला होता. जामीन अर्जात म्हटले होते आहे की जयस्वाल पूर्णपणे निर्दोष आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. या प्रकरणी २० जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी १२ जणांना विशेष NDPS न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह अन्य तिघांना जामीन मंजूर केला होता.

एका गुप्त माहितीच्या आधारे, NCB च्या पथकाने २ ऑक्टोबरच्या संध्याकाळी मुंबईतून गोव्याकडे जाणार्‍या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला आणि कथितरित्या ड्रग्ज जप्त केले होते. सुरुवातीला, या प्रकरणाचा तपास एनसीबी मुंबईने केला आणि नंतर हे प्रकरण एसआयटीकडे दिले. ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाच्या तपासासाठी DDG संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली NCB मुख्यालय नवी दिल्लीने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. (Cruise drug bust cas)

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी जवळपास महिनाभर तुरुंगात घालवल्यानंतर जामीन मंजूर झाला. त्यांची प्रत्येकी १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. न्यायालयाने ५ पानी आदेशात १४ अटीही घातल्या होत्या. त्यातील एका अटीनुसार आरोपींनी दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावणे आणि तपासात सहकार्य करणे आवश्यक होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT