पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. असे ट्विट करत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर बातमी (Vijay Wadettiwar security)
शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या १५ नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. या निर्णयावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे, "केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते. मात्र, मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे असेही म्हंटले आहे की, सुरक्षा काढल्यामुळे नक्षलग्रस्त भागात मी करत असलेले काम किंवा दौरे कमी होणार नाही. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता. "