Latest

T20 World cup : रिंकू सिंहला संघात का घेतलं नाही? माजी कर्णधार सौरव गांगुलींनी सांगितले कारण

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आगामी टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेकडे वेधले आहे. नुकतीच या स्‍पर्धेतसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. मागील दोन वर्षांमध्‍ये आपल्‍या तुफानी फलंदाजीने क्रिकेटविश्‍वाला दखल घेण्‍यास भाग पडणार्‍या रिंकू सिंह याला संघात स्‍थान मिळालेले नाही. निवड समितीच्या या निर्णयावर टीका होत आहे. आता माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कारण सांगितले आहे.

'या' कारणासाठी रिंकूला संघात मिळालं नाही स्‍थान

बंगाल प्रो टी20 लीगच्या ट्रॉफीचे अनावरण प्रसंगी सौरव गांगुली म्‍हणाले की, भारतीय संघात निवड झाली नाही म्‍हणून रिंकूने निराश होण्याची गरज नाही. वेस्‍ट इंडिजमधील परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाचा धोरणात्मक निर्णय होता. चार राखीव खेळाडूंच्या यादीत रिंकूचा समावेश आहे

'रिंकूसाठी ही फक्त सुरुवात आहे'

T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे जिथे विकेट्स मंद असू शकतात ज्यामुळे फिरकीपटूंना मदत होईल, म्हणून निवडकर्त्यांना अतिरिक्त फिरकीपटूचा समावेश करायचा होता. कदाचित त्यामुळेच रिंकूला संधी मिळू शकली नाही, पण रिंकूसाठी ही फक्त सुरुवात आहे. संघात निवड न झाल्याबद्दल त्‍याने निराश होता कामा नये.

टी-२० विश्‍वचषक स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहील'

गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणेच भारत आणि ऑस्ट्रेलिया 1 जूनपासून होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व गाजवतील, असा विश्‍वास गांगुली यांनी व्‍यक्‍त केला आहे. या स्‍पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे या स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्येही त्‍यांची कामगिरी सर्वोत्तम असेल याची मला खात्री आहे. हा भारतीय संघ अप्रतिम आहे, या संघातील सर्वच खेळाडूंकडे सामना जिंकून देण्‍याच कसब आहे. १५ सदस्यीय संघात निवडीसाठी पात्र आहेत, असेही यावेळी सौरव गांगुली यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT