पुढारी ऑनलाईन डेस्क :
आतापर्यंतच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर फुटबॉल विश्वातील अनेक विक्रम आहेत. त्यासोबतच त्याच्या नावावर सोशल मीडियाशी निगडीत ही काही विक्रम जोडले गेलेले आहेत. आता रोनाल्डो हा जगातील पहिला असा व्यक्ती बनला आहे की ज्याचे लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवरती ४०० मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
त्याचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ रोजी पोर्तुगालमधील फुंचाल या शहरात झाला. त्याचे पूर्ण नाव ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सॅंटोस एवेरो असे आहे. रोनाल्डोचे वडील जोसे दिनिस अवेरो एका बागेत माळी म्हणून काम करत होते. रोनाल्डोचे नाव अमेरिकेचे अभिनेते आणि राष्ट्रध्यक्ष रोनाल्ड़ रेगन यांच्या नावावरून ठेवण्यात आले. रोनाल्डोचे वडील हे रेगन यांचे चाहते असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव रोनाल्डो असे ठेवले. रोनाल्डोचे बालपण पत्राच्या घरात गेले. घरात गरीबी असल्यांमुळे रोनाल्डोचे वडील बागेत माळी म्हणून काम करत होते.
रोनाल्डोच्या परिवारात आई-वडीलासह दोन भाऊ एक बहीण असे परिवार होते. रोनाल्डोला लहानपणापासूनच फु़टब़ॉची आवड होती. तो लहान वयात फुटबॉल चांगल्यापध्दतीने खेळायचा. रोनाल्डो आठ वर्षाचा असताना त्याला फुटबॉल क्लब अन्डोरिनाकडून खेळण्याची संधी मिळाली. रोनाल्डोच्या आईचे नाव मारिया असे आहे.
त्या रोनाल्डोला लहान असताना 'क्राय बेबी' म्हणायच्या. कारण, रोनाल्डोला एखाद्या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही किंवा त्याच्या संघाचा पराभव झाल्यास तो भर मैदानातचं रडत असे म्हणून त्याच्या आईने हे नाव पाडले होते. आजही महत्वाचा सामना हरल्यानंतर किंवा चांगली खेळी न करता आल्यास रोनाल्डो आपल्या भावना व्यक्त करतो. रोनाल्डो शाळेत असताना तो वर्गात कमी आणि फुटबॉलच्या मैदानात जास्त असायचा.
रोनाल्डो दहा वर्षचा असताना त्याला पोर्तुगालमधील एका फुटबॉल क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. या संघाकडून तो काही काळ खेळला. त्यानंतर स्पोर्टिंग लिस्बनचे वरिष्ट अधिकारी नवीन खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी स्पोर्टिंग लिस्बनचे वरिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की. जो खेळाडू सर्वाधिक गोल करेल त्या खेळाडूची निवड संघात करण्यात येईल. रोनाल्डोच्या संघाने त्या सामन्यात ३-० गोल अशा फरकाने विजय मिळवला.
त्यामध्ये रोनाल़्डोचे दोन आणि अल्बर्ट फ्रँटोचा एक गोल होता. खरं म्हणजे अल्बर्ट फ्रँटोला वैयक्तिक दुसरा गोल करण्याची संधी होती पण, त्याने तस न करता गोलकिपरला चकवा देत बॉल रोनाल्डोकडे दिला व त्याला गोल करण्याची संधी दिली या संधीचा उपयोग करून रोनाल्डोने दुसरा गोल केला व त्याची स्पोर्टिंग लिस्बन अॅकॅडमीमध्ये निवड करण्यात आली. सामन्यानंतर अल्बर्टला विचारले की तु तुझी गोलची करण्याची संधी सो़डून रोनालडोला संधी का दिलीस? यावर तो म्हणतो रोनाल्डो हा माझ्यापेक्षा अधिक प्रतिभावंत खेळाडू आहे तो त्या संधीचे सोने करेल असे तो म्हणतो. यामुळे रोनाल्डो आणि अल्बर्ट फ्रँटोची मैत्री अधिक घट्ट झाली.
खेळ बघून स्पोर्टिंग लिस्बन क्लबने रोनाल्डोला आपल्या संघाकडून १५ पाऊंड देऊन करारबद्द केले. ह्या संघाचे होम ग्राऊंड लिस्बन या शहरात असल्यामुळे या संघाकडून खेळण्यासाठी वयाच्या १२व्या वर्षी रोनाल्डो आपल्या कुटूंबाला सोडून लिस्बन शहरात जावे लागणार होते. तेथे तीन वर्ष खेळल्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी त्याला ह्रदयाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला ह्रदयाचा मोठा विकार असल्याचे निष्पन झाले. या आजारात रोनाल्डोने फुटब़ॉल खेळणं सोडावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला हो़ता. डॉक्टरांनी त्यावेळी त्याला दोन सल्ले दिले होते. पहिल्या सल्ल्यात त्याला कायमचे फुटबॉल खेळण बंद करावं लागणार होतं.
आणि दुसरा सल्ला म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी त्याला ह्रदयाची सर्जरी करावी लागणार होती. दिवसातील ८-१० तास मैदानावर सराव या करणाऱ्या रोनाल्डोने यावेळी दूसरा सल्ला निवडला. या सर्जरीमध्ये त्याच्या जीवाला धोका असतानाही फुटबॉलच्या प्रेमापोटी या 'क्राय बेबीने' आपल्या ह्रदयाची सर्जरी करून घेतली. सर्जरी झाल्यानंतर काही काळातच रोनाल्डो मैदानावर परतला.
या काळातुन पुढे जात असताना रोनाल्डोच्या आयुष्यात वाईट दिवस उजाडला. दारूच्या अतिसेवनाने रोनाल्डोचे वडील जोसे दिनिस अवेरो यांचे निधन झाले. आपल्या वडिलांच्या निधन दारूमुळे झाले. त्यामुळे आपण दारूचे सेवन करायचे नाही असे निर्णय त्याने घेतला. आणि त्या निर्णयाचे पालन तो आजही करत आहे. त्या काळात जोसे दिनिस अवेरो हेच घरातील कमवणारे व्यक्ती होते. त्यांच्या निधनानंतर परिवाराची जबाबदारी रोनाल्डोची आई मारिया यांच्या खांद्यावर आली, दुसऱ्यांच्या घरात काम करून मिळणाऱ्य़ा पैशातून त्या संसाराचा गाडा पुढे चालवत होत्या.
या सर्व संकटांचा सामना करत असताना रोनाल्डो फुटबॉलवरून जराही आपले लक्ष विचलीत होऊ दिले नाही. रोनाल्डो आपला पहिला फ्रोफेशनल फुटबॉलची पहिला सामना वयाच्या १७ व्या वर्षी खेळाला. या सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अथक परिश्रम, जिद्दृ, चिकाटीच्या जोरावर तो दिवसेंदिवस फुटबॉलमध्ये अधिकच बहरत होता.
वयाच्या १८ व्या वर्षी त्याला युरोपमधील मानांकित मॅनचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबने त्याला १७ मिलियन डॉलर्समध्ये करारबद्द केले. या टीमकडून खेळाताना ऱोनाल्डोने जर्सीवरील नंबरसाठी २८ नंबर मागितला होता. परंतु तेथे त्याला '7' नंबरची जर्सी देण्यात आली. आज पर्यंत रोनाल्डो अनेक संघांकडून खेळला आहे. मॅनचेस्टरकडे २८ नंबरची जर्सी मागणारा रोनाल्डो आजही '7' नंबरच्या जर्सीमध्ये खेळत आहे. मॅनचेस्टरकडून खेळत असताना सर अॅलेक्स यांच्य़ा मार्गदर्शनाखाली रोनाल्डोचा खेळ बहरतच गेला. मॅनचेस्टरसोबत असताना त्याने अनेक चषक जिंकले. त्यामध्ये ३ प्रिमिअर लीग टायटस, १ चॅम्पियन्स लीग टायटल,१ फिफा क्लब वर्ल्डकप असे चषक जिंकले आहेत.
२००९ मध्ये तो स्पेनमधील रिअल मद्रिद संघासोबत करारबद्द झाला. यावेळी रिअल मद्रिदने रोनाल्डोला १३२ मिलियन डॉलर्स दिले होते. त्या काळातील हा सर्वात महागडा करार होता. हा करार २००९ ते २०१५ इतक होता. या काळात रोनाल्डो अधिक परिपक्व होत गेला. मद्रिदकडून खेळताना तो संघासाठी महत्वाची खेळी करत राहीला. स्पेनमध्ये त्याने स्वत:ची आक्रमक खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. या संघासोबत त्याने १५ चषक जिंकले आहेत. यामध्ये २ ला लीगा, ४ चॅम्पियन्स लीग असे अनेक चषक समाविष्ट आहेत.
स्पेन गाजवल्यानंतर रोनाल्डोने आपला मोर्चा इटलीकडे वळवला इटलींमधील युवेंटस संघाने रोनाल्डोला १०० मिलियन डॉलर्समध्ये करारबद्द केले. ३० पेक्षा अधिक वय असणाऱ्या कोणत्याही खेळाडू मिळालेली सर्वाधिक रक्कम होती. इटलीकडून खेळाताना रोनाल्डोने युवेंटससाठी अनेक सामन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. इटलींमधील सिरी-ए वर देखील रोनाल्डो आपले नाव कोरले आहे. युवेंटससोबतचचा करार संपल्यानंतर मॅनचेस्टरने रोनाल्डोसोबत करार केला आहे. ह्या करारवेळी रोनाल्डोने घर वापसी केली अशी लोकांची प्रतिक्रिया होती.
जाणून घेऊया रोनाल्डो विषयी…