Latest

काॅंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? शनिवारी होणार पक्षाची बैठक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : काॅंग्रेसने संघटनात्मक निवडणुकीसहीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी पक्षाचे महासचिव आणि प्रभाी यांनी बैठक आयोजित केली आहे. यावेळी अखिल भारतीय काॅंग्रेस समितीचे महासचिव आणि प्रभारी उपस्थित असतील, या बैठकीचे अध्यक्षपद महासचिव के. सी. वेणूगोपाल करणार आहेत. विशेष सदस्य अभियान, संघटनात्मक निवडणुका आणि आंदोलने यांचे नियोजन करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. (काॅंग्रेसचा अध्यक्ष)

आतापर्यंत काॅंग्रेस पक्षातील जी-२३ मधील नेते संघटनात्मक निवडणुकांमधील परिवर्तनावर जोर देत आले आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर भाष्य करताना म्हटले आहे की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये यावर ठोस निर्णय घेतला जाईल. या महिन्यांत पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक संपेल. तोपर्यंत मी पक्षात काही मर्यादेपर्यंत बदलू शकेन", अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (काॅंग्रेसचा अध्यक्ष)

देशातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या ५ महत्वाच्या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्षांतर्गंत परिवर्तन होणे, गरजेचे असे काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेतांचे मत होते. काही नेत्यांनी खुलेपणाने काॅंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस माध्यमांसमोर आणलेली आहे. आता या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने आपली रणनिती बदलण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे बोलले जात आहे.

पहा व्हिडिओ : जगात मला धर्मेंद्रशिवाय काहीच चांगलं वाटत नाही.. कोण आहे हा धर्मेंद्रचा कट्टर फॅन?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT