Latest

WHO : ५७ देशांमध्ये आढळले ओमायक्राॅनचे रुग्ण; जगभरात चिंतेचं वातावरण

backup backup

जिनेव्हा, पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या अर्थात ओमायक्राॅनचा संसर्ग भारतासह जगभरात वेगाने पसरत आहे, त्यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आज सांगितलं की, "ओमायक्राॅनचा संसर्ग झालेल्या रुग्ण आतापर्यंत ५७ देशांमध्ये आढळून आलेले आहेत. झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे."

ओमायक्राॅन या व्हेरियंटसंदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीवर ओमायक्राॅन परिणाम करतो का? डेल्टापेक्षा हा संसर्गजन्य आहे का? जर रुग्ण वाढले तर रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे का? संसर्ग प्रकरणांची वाढ आणि मृत्यूचा दर यामध्ये किती अंतर असेल? यासारखे प्रश्न नागरिकांमध्‍ये निर्माण झाल्यामुळे डब्ल्युएचओने (WHO) म्हंटलं आहे की, ओमायक्राॅन व्हेरियंटसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी त्याच्या तीव्रतेचं मूल्यांकन करावं लागेल आणि त्यासाठी डेटा आवश्यक आहे.

ओमायक्राॅन रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर झिम्बाब्वे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. ज्यांना कोरोनाची लस मिळालेली नाही, त्यांना सार्वजनिक वाहतूक करण्यासाठी निर्बंध घातेलेले आहेत.झिम्बाब्वे सरकारने म्हंटलं आहे की, देशामध्ये कोरोना लसीकरणाचा दर वाढविला जाईल. त्याचबरोबर व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून यासाठी कडक निमयदेखील लागू करण्यात येतील. या वर्षाच्या अखेरपर्यंत ६० लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

ओमायक्राॅन व्हेरियंट जीवघेणा नाही…

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा निश्चितरित्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक नाही, असे अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फॉउसी (Anthony fauci) यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या के बी.1.1.1.529 व्हेरियंटमध्ये मोठ्या संख्येने म्युटेशन पाहायला मिळत आहेत. तरीही हा व्हेरियंट जीवघेणा नाही. नव्या व्हेरियंटच्या अभ्यासातून हा कमी गंभीर स्वरुपाचा असू शकतो, असे संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ओमायक्रॉन बाबत आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT