Latest

Shreyanka Patil : कोण आहे RCBची श्रेयांका पाटील? दिल्लीला लोळवून सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वात सध्या एका नव्या महिला खेळाडूचे नाव खूप चर्चेत आले आहे. श्रेयांक पाटील (Shreyanka Patil) असं तिचं नाव आहे. सोशल मीडियावर ती सध्या ट्रेंडिंगवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. 2024 मधील WPL च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या टीमला विजय मिळवून देत तिने चमकदार कामगिरी केली आहे. श्रेयांकचा WPL चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे. जाणून घेऊया श्रेयांक विषयी अधिक माहिती.

श्रेयांक पाटील (Shreyanka Patil)  ही मूळची कर्नाटकमधील आहे. रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (DC) 113 धावांवर गुंडाळत मोठी कामगिरी केल्याने तिला इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट जिंकला. तिची ही खेळी पाहून चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्याचबरोर अंतिम फेरीत चार विकेट्स घेत तिने आऱसीबीला मिळवून दिलेले विजयाचे क्षण अनेकांनी डोळ्यात टिपले आहेत. यामुळे ती ट्रेंडिंगवर आली आहे.

विराट कोहली हा श्रेयाचा आदर्श

श्रेयंका पाटील यांचा जन्म ३१ जुलै २००२ रोजी बंगळुरु, कर्नाटक येथे झाला. श्रेयंका पाटील विराट कोहलीला आपला आदर्श मानते. वयाच्या ९व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. श्रेयंका पाटील ही उत्कृष्ट ऑफ स्पिन गोलंदाज आहे. श्रेयंका पाटीलने भारतासाठी २ एकदिवसीय सामन्यात ४ बळी आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ बळी घेतले आहेत. परदेशी लीगसाठी करारावर स्वाक्षरी करणारी श्रेयंका पाटील ही पहिली अनकॅप्ड भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

कर्नाटकमधून अंडर-16 मध्ये खेळत क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण

या 21 वर्षीय राईट हँड ऑफ-ब्रेक गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूने कर्नाटकमधून अंडर-16 मध्ये खेळत क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केले. तिने 2023 मध्ये आशिया कपच्या T20 स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळून राष्ट्रीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 2023 मध्ये ती डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय डाव (WODI) स्पर्धेत खेळली. पाटील 2023 मध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही खेळली. संघ गयाना ॲमेझॉन वॉरियर्स जिथे ती पुन्हा एकदा सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT