Hardik Pandya Press Conference : ‘या’ प्रश्नांनी उडवली हार्दिक पंड्याची भांबेरी! भर पत्रकार परिषदेत झाली फजिती

Hardik Pandya Press Conference : ‘या’ प्रश्नांनी उडवली हार्दिक पंड्याची भांबेरी! भर पत्रकार परिषदेत झाली फजिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya Press Conference : 'कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मासोबतच्या नात्यात काही अस्वस्थता होती असे मला वाटत नाही. आमच्या दोघांमध्ये काहीही वेगळे होणार नाही. जेव्हा जेव्हा मला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा हिटमॅन मला सहाय्य करेल. तो भारतीय कर्णधार असल्याचे मी यापूर्वीही सांगितले आहे. मी जवळपास माझी संपूर्ण कारकीर्द रोहितच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली एमआयच्या संघाने जे काही साध्य केले ते मला पुढे नायचे आहे,' अशी भावना MI चा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने व्यक्त केली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता. यावेळी संघाचे कोच मार्क बाऊचर हे देखील उपस्थित होते.

एमआयमध्ये पुनरागमन केल्यानंतर आणि कर्णधार बनल्यानंतर पंड्याने रोहितसोबतच्या नातेसंबंधावर प्रतिक्रिया दिली. IPL 2024 साठी पंड्याचे GT मधून ट्रान्फरकरण्यासाठी MI ने मोठी रक्कम मोजली होती. त्या घडामोडीनंतर हिटमॅनच्या जागी हार्दिककडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर पंड्याबद्दल अनेक टीकात्मक पोस्ट शेअर झाल्या.

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याला पहिलाच प्रश्न एमआयचे कर्णधारपद मिळाल्यापासून त्याचे आणि रोहित शर्माचे बोलणे झाले आहे का? यावर विचारण्यात आला. यावर यावर हार्दिकने स्पष्टपणे 'नाही' असे उत्तर दिले. तो म्हणाला, 'नाही. कारण रोहित त्यावेळी दौरा करत होता. तो टीम इंडियाचा कर्णधार आहे. शेवटी, आम्ही सर्व व्यावसायिक खेळाडू आहोत, आम्ही बर्याच काळापासून एकमेकांना भेटलो नाही. पण जेव्हा आयपीएल सुरू होईल आणि तो एमआयमध्ये सामील होईल तेव्हा आम्ही नक्कीच चर्चा करू,' असा खुलासा केला.

हिटमॅनबद्दल पंड्या काय म्हणाला? (Hardik Pandya Press Conference)

पंड्या म्हणाला की, 'कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मासोबतच्या नात्यात काही अस्वस्थता होती असे मला वाटत नाही. आमच्या दोघांमध्ये काहीही वेगळे होणार नाही. जेव्हा जेव्हा मला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा हिटमॅन मला सहाय्य करेल. तो भारतीय कर्णधार असल्याचे मी यापूर्वीही सांगितले आहे. मी जवळपास माझी संपूर्ण कारकीर्द रोहितच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली एमआयच्या संघाने जे काही साध्य केले ते मला पुढे नायचे आहे.'

पंड्या-बाउचरने या प्रश्नाचे उत्तर टाळले

पत्रकारांनी काही प्रश्न विचारले ज्यांची उत्तरे हार्दिक पंड्या, कोच बाउचर यांच्याकडेही नव्हती. विशेषत: बाउचर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की, अशी कोणती रणनिती अथवा व्हिजन आहे ज्या अंतर्गत रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी हार्दिक पंड्याला नेतृत्व सोपवण्याच्या निर्णय व्यवस्थापनाने घेतला? यावर कोच बाउचर यांनी माइक उचलला पण नंतर डोके हलवून उत्तर देण्यास नकार दिला. त्याचवेळी पांड्याला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुझ्याशी झालेल्या करारात कर्णधारपदाची अट होती का? यावर पंड्याने केवळ मिश्किल हास्य करून प्रश्नाला बगल दिली.

ट्रोलिंगवर हार्दिकचे उत्तर, म्हणाला…

ट्रोलिंग करण्यावरून हार्दिकला प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'असे घडेल याची मला कल्पना होती. रोहितने एक साम्राज्य निर्माण केले आहे. मी चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो, कारण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रसिद्धी आणि सर्व काही मिळाले आहे. पण माझ्या हातात जे आहे ते मी नियंत्रित करू शकतो. सध्या माझे लक्ष माझ्या कामावर असेल. कॅप्टनची माळ गळ्यात पडल्यापासून माझा आणि रोहित शर्माचा जास्त काही संवाद झालेला नाही. रोहित क्रिकेटमुळे खूप प्रवास करत होता. तो संघाशी जेव्हा जोडला जाईल तेव्हा नक्कीच त्याच्याशी चर्चा करीन.' (Hardik Pandya Press Conference)

2013 मध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला. त्या हंगामातील अर्ध्या सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सची कमान रोहितकडे सोपवण्यात आली. त्याचवर्षी एमआयने त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. तेव्हापासून ते 2023 पर्यंत संघाने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आणि या जेतेपदाच्या प्रवासात प्रत्येक वेळी रोहित शर्मा हाच कर्णधार होता. आयपीएलमध्ये केवळ दोनच कर्णधारांना 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश आले आहे. त्यात रोहित आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. मात्र 2024 च्या हंगामापूर्वी आश्चर्यकारकपणे रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यात आले आणि त्याची जागा हार्दिक पंड्याला देण्यात आली.

आयपीएल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिला सामना शुक्रवारी म्हणजेच 22 मार्च रोजी खेळला जाणार आहे. चेन्नईत पहिल्या दिवशी आरसीबी आणि सीएसकेचे संघ आमनेसामने येतील. दरम्यान, पाच वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरणा-या मुंबई इंडियन्स संघाची तयारीही जोरात सुरू आहे. सर्व खेळाडू आपला सराव करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news