WPLमध्ये हरमनप्रीत कौरचे वादळ! 6 षटकात 91 धावा चोपल्या, मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र

WPLमध्ये हरमनप्रीत कौरचे वादळ! 6 षटकात 91 धावा चोपल्या, मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीग (WPL) चा दुसरा हंगाम अंतिम टप्प्याकडे जात असून स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी रात्री यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सकडून विजय हिसकावून घेतला, तर शनिवारी, मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 190 धावा ठोकल्या. एमआयने हे लक्ष्य 1 चेंडू आणि 7 गडी बाकी असताना चुरशीने गाठले. एमआयचा हा स्पर्धेतील 5वा विजय आहे. मुंबई इंडियन्सच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर चमकली. तिने 48 चेंडूत 10 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 95 धावांची नाबाद खेळी खेळली. शेवटच्या 6 षटकात संघाला 91 धावांची गरज असताना हरमनप्रीतने सामना एकहाती आपल्या बाजून फिरवला.

मुंबई इंडियन्सच्या या विजयासह, WPL 2024 मधील गुजरात जायंट्स (GG) चा प्रवास इथेच संपला आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला आहे.

WPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि संघ 10 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सचा 6 सामन्यांमधला हा 5वा पराभव आहे. जीजी 2 गुणांसह गुणतालिकेत तळात पाचव्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या, आरसीबी 6 गुणांसह तिसऱ्या आणि युपी वॉरियर्स 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news