Latest

Omicron News : पॉझिटिव्ह बातमी; ३८ देशांमध्ये पसरलेल्या ओमायक्रॉनच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, सगळे ठणठणीत

backup backup

जिनेवा : पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron News) आता हळूहळू जगातील इतर देशांमध्येही वेगाने पसरत आहे. दरम्यान WHO च्या माहितीनुसार कोरोनाचा हा नवीन प्रकार ३८ देशांमध्ये पसरला आहे. मात्र या नव्या व्हेरियंटमुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू नोंद झालेला नाही. सगळे बरे असल्याची पुष्टी देण्यात आली आहे

दरम्यान अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या दो आठवड्यांपुर्वी सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जवळपास ३८ देशांत प्रवेश केला आहे.

Omicron News : युरोपमध्ये कोरोनाचा आकडा डबल होण्याची शक्यता

ओमायक्रॉनच्या संदर्भात, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार किती संसर्गजन्य आहे हे निर्धारित करण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. यामुळे अधिक गंभीर आजार होतो का? तसेच त्यावर किती प्रभावी उपचार आणि लसी आहेत?. डब्ल्यूएचओने असा इशारा दिला आहे की पुढील काही महिन्यांत युरोपमधील निम्म्यांहून अधिक कोरोना प्रकरणे आढळू शकतात.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, नवीन प्रकार डेल्टा स्ट्रेनप्रमाणेच जागतिक अर्थव्यवस्थेची पुनर्प्राप्ती देखील कमी करू शकतो. २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या सुरुवातीच्या अभ्यासात संशोधकांनी या नवीन प्रकाराबद्दल सांगितले होते.

अमेरिकेत या प्रकाराची दोन प्रकरणे आढळली आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये काल (दि.०४) शुक्रवारी सिडनीतील तीन विद्यार्थ्यांना नव्या व्हेरियंटची लागण झाली. नॉर्वेमधील गेल्या आठवड्यात ओस्लो येथील कार्यालयात ख्रिसमस पार्टीनंतर किमान १३ लोकांमध्ये कोरोनाचे नवीन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले.

मलेशियामध्येही १९ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या परदेशी विद्यार्थ्यामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले. श्रीलंकेतही काही रुग्णांना ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरियंटची पाच बाधित पळाले

देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती वाढत असतानाच कर्नाटकातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून बंगळूर येथे आलेले पाच प्रवाशी बेपत्ता झाले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बेपत्ता असलेले पाचजण २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान बंगळूरमध्ये दाखल झाले होते. पण प्रशासनाला त्यांचा निश्चित ठावठिकाणा सापडलेला नाही. या घटनेची गंभीर दखल घेत जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची बंगळूर महानगरपालिका प्रशासन शोध घेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT