Latest

Whatsapp Scame | व्हॉट्सअ‍ॅपवरील या ‘७’ लिंक चूकनही करु नका क्लिक, अन्यथा बसेल मोठा फटका 

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानला जातो. व्हॉट्सअ‍ॅप वेगवेगळ्या आणि हटके फिचरमुळे दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होवू लागले आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप वरुन हॅक, धमकी, पैसे उकळणे, आपली वैयक्तिक माहिती घेवून फसवणूक आदी प्रकार घडत असतात. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक लिंक असतात ज्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला येत असतात. काही फसव्या लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर येत असतात. या लिंकद्वारेही फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा कोणत्या लिंक आहेत ज्यावर क्लिक केल्यामुळे आपल्याला फटका फसण्याची दाट शक्यता असते. त्या सात लिंक पुढीलप्रमाणे. (Whatsapp Scame)

अलीकडेच सिक्युरिटी कंपनी McAfee ने ग्लोबल स्कॅम मेसेज अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात स्मार्टफोन यूजर्संना चेतावणी देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी ७  धोकादायक मेसेज सूचीबद्ध केले आहेत. या ७ लिंक गुन्हेगार मोबाईल  हॅक करण्यासाठी किंवा पैसे चोरण्यासाठी एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवतात. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ८३ टक्के भारतीयांनी अशा बनावट लिंकवर क्लिक केले आहे. किंवा ते या फसवणुकीला बळी पडले आहेत. त्यात असाही दावा केला आहे की भारतीयांना दररोज ईमेल, मजकूर किंवा सोशल मीडियाद्वारे दररोज सुमारे १२ बनावट संदेश मिळतात. येथे असे ७ धोकादायक संदेश आहेत ज्यावर तुम्ही कधीही क्लिक करू नये. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

Whatsapp Scame : तुम्ही बक्षीस जिंकले आहे!

तुम्ही बक्षीस जिंकले आहे! अश्या स्वरुपाचे संदेश आणि लिंक तुम्हाला किंवा तुमच्या माहितीतील लोकांना आलेले तुम्ही पाहिलं असेल. असे संदेश  काही बदलांसह देखील येऊ शकतात. उदा. जिंकलेल्या पुरस्काराचा उल्लेख करणे. परंतु तुम्हाला आलेला संदेश आणि लिंक घोटाळा असण्याची आणि ज्याला ती लिंक मिळाली आहे त्याची वैयक्तिक माहिती किंवा पैसे चोरण्यासाठी ९९ टक्के दाट शक्यता असते.

खोट्या नोकरीच्या ऑफर

बऱ्याचवेळा नोकरीच्या ऑफर असणारे संदेशासह लिंक व्हायरलं होतं असतात. पण बहुतांश नोकरीच्या ऑफर लिंक या व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएस येत नसतात. जर त्या आल्या तर त्यामध्ये अधिकृतरित्या  माहिती असते. जर का अशी लिंक आली असेल तर इतर सोशल प्लॅटफॉर्मवरही संबधित नोकरी बद्दल काही माहिती मिळते का ते पाहा.

तुम्ही न केलेल्या खरेदीची माहिती

तुम्ही न केलेल्या खरेदीबद्दलची कोणत्याही स्वरुपाची माहिती आली असेल. तर तिथे फसवणुकीचा प्रकार असण्याची दाट शक्यता असते. अशा स्वरुपाचे संदेश हे  यूजर्संना क्लिक करण्यासाठी आणि त्यांचे फोन हॅक करण्यासाठी प्रलोभन देण्यासाठी लिहिले जातात.

Whatsapp Scame : OTT सदस्यता अद्यतने

ओटीटीची लोकप्रियता वाढत असताना, स्कॅमर स्मार्टफोन यूजर्संना नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी सबस्क्रिप्शनच्या संदर्भात किंवा सदस्यत्व संदर्भात संदेश पाठवला जातो. या संदेशाद्वारे यूजर्सला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. या मोफत ऑफर किंवा मेसेज असू शकतात ज्यांची सदस्यता संपुष्टात आली आहे.

URL सह बँक सूचना, संदेश

मेसेजमधील युआरएल/लिंकद्वारे यूजर्संना केवायसी पूर्ण करण्यास सांगणारे संदेश किंवा व्हॉट्सअ‍ॅप वर आलेले बँक अलर्ट संदेश हे घोटाळे असण्याची दाट शक्यता असते. यातून बऱ्याचवेळा प्राप्तकर्त्यांच्या बॅंकमधील  तुमचे पैसे चोरण्याचा त्यांचा उद्देश असू शकतो.

बनावट मिस्ड डिलिव्हरी किंवा डिलिव्हरी समस्या, सूचना

मिस्ड डिलिव्हरी किंवा इतर डिलिव्हरी समस्यांबद्दल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप सूचना देखील धोकादायक आहेत. तुम्ही खरेदी केल्यावरही हे असू शकते. शक्यतो मिस्ड डिलिव्हरी संदर्भआत संदेश आला असेल तर संबधित कंपनीकडून पडताळून पाहा.

Whatsapp Scame : ई-कॉमर्स कंपनीचे संदेश

ई-कॉमर्स कंपन्या सुरक्षा सूचना, किंवा तुमच्या खात्यातील कोणत्याही अद्यतनासंबंधी सूचना संदेश देखील हॅक, घोटाळे असण्याची शक्यता असु शकतात. पण शक्यतो  कोणतीही ईकॉमर्स कंपनी अशा महत्त्वाच्या सूचनांसाठी तुमच्यापर्यंत व्हॉट्सॲपवर संदेश पाठवत नाही.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT