Latest

Weather Update : किमान तापमानात किंचित वाढ

Laxman Dhenge

पुणे : राज्याच्या बहुतांश भागांतील किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि आसपासच्या भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे.

त्यामुळे धुके आणि किमान तापमानात थोडी वाढ झालेली दिसून येत आहे. असे असले तरी राज्यात अजूनही थंडी पाहिजे तशी पडलेली नाही. दरम्यान, राज्यातील विदर्भाच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT