Latest

Weather Update : राज्यात पुण्याचा पारा नीचांकी; हुडहुडी वाढली

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराचा पारा गुरुवारी राज्यात सर्वांत कमी 10.9 अंशांपर्यंत खाली आला होता. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे शहरात आल्याने बुधवारी रात्रीपासून शहरातील तापमान घटले. काश्मिरात हिमवर्षाव सुरू झाल्याने उत्तर भारतात गारठा वाढला आहे. तसेच, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे.

त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटले आहे. असे वातावरण 23 फेब्रुवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी 22 रोजी पुणे शहरातील एनडीए भागाचे किमान तापमान राज्यात सर्वात नीचांकी 10.9 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यापाठोपाठ शहरातील शिवाजीनगर 12.5 अंशांवर, अहमदनगर 13.6, सातारा 13.5 अंशांवर होते.

गुरुवारचे राज्याचे किमान तापमान

पुणे (शिवाजीनगर 12.5, एनडीए 10.9), अहमदनगर 13.6, सातारा 13.5, जळगाव 14.4, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 14.2, नाशिक 16.2, सांगली 16.9, सोलापूर 18.2, छत्रपती संभाजीनगर 17.4, परभणी 18.4, नांदेड 17.2, बीड 15.8, अकोला 18.4, नागपूर 17.6, वाशिम 14.4.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT