Latest

Weather Update: उत्तर भारत गारठला; धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह उत्तर आणि वायव्य भारतातील थंडी वाढण्याची शक्यता आहे. राजस्थान, हरियाणा, बिहार, छत्तीसगडमध्ये १७ ते १९ जानेवारी दरम्यान थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्‍यान, दाट धुक्‍यामुळे उत्तर भारतातील रेल्‍वेसेवा विस्‍कळीत झाली आहे.

दिल्ली हवामान केंद्राने येथील सफदरजंग येथे १.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. यामुळे राजधानीत १६ जानेवारी हा या हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. आज (दि.१७) दिल्लीतील किमान तापमान १ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. उत्तर भारतात १९ ते २१ जानेवारी दरम्यान किमान तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.

धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

थंडी आणि प्रचंड धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वेच्या १५ गाड्या उशीरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली. थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

पश्चिम हिमालयात बर्फवृष्टी

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सध्याच्या स्थितीनुसार, पश्चिम हिमालयात १८ जानेवारीपर्यंत याचा परिणाम जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे जम्मू-काश्मिर, लडाख, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड या भागात १८ ते २० जानेवारी दरम्यान तुरळक पाऊस किंवा बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT