Latest

Weather Forecast : ‘बिपरजॉय’चा भारतीय किनारपट्टीवर थेट परिणाम नाही…वाचा ‘मान्सून’ची वाटचाल

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: Weather Forecast :अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ तीव्र झाले आहे. तरी ते भारतीय किनापट्टीपासून दूर आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीवर थेट परिणाम होणार नाही. मात्र गुजरात किनारपट्टीवर अप्रत्यक्षपणे वादळी वार्‍याचा वेग काहीसा वाढणार आहे. तसेच पुढच्या ४८ तासात मान्सून ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहोपात्रा यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

IMD चे महासंचालक डॉ. मोहोपात्रा पुढे म्हणाले, 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा वेग पुढील काही तासात वाढणार आहे. परंतु हे वादळ उत्तर वायव्य दिशेने पुढे सरकरत आहे. त्यामुळे भारतीय किनारपट्टीवर याचा प्रत्यक्ष कोणताही प्रभाव जाणवणार नाही. मात्र, गुजरातच्या किनारपट्टीवरील वाऱ्याच्या वेगात वाढ होणार आहे. त्यामुळे उत्तर अरबी समुद्रात मच्छिमारांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान १५ जूनपर्यंत मध्य अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला मच्छिमारांना देण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. Weather Forecast

Weather Forecast : पुढील ४८ तासांत मान्सून ईशान्येकडील राज्यांमध्ये – डॉ. महापात्रा

नैऋत्य मान्सून काल (०८ जून) केरळात दाखल झाला आहे. पुढील ४८ तासात मान्सून केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटकातील काही भाग आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तसेच ईशान्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच्या प्रभावाखाली पुढील ४८ तासांत मान्सून ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचेल, असा दावा IMD चे महासंचालक डॉ. मोहोपात्रा यांनी केला आहे. Weather Forecast

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT