Latest

आम्‍हाला बंडाची कल्‍पना नव्‍हती; एका आमदाराच्‍या भावाचा फोन

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा : सोमवारी विधानपरिषदेच्‍या दहा जागांसाठी निवडणूक होती. त्‍यामुळे सर्व आमदार मुंबईत जमले होते. निकाल लागल्‍यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना आपल्‍याला एका विषयावर बोलायचे आहे म्‍हणून गाडीत बसण्‍यास सांगितले. त्‍यामुळे आम्‍ही गाडीत बसलो. असे एका आमदारांच्या भावाने सांगितले आहे.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, मध्‍यरात्री लक्षात आल्‍यानंतर आपण आपल्‍या भावाला फोन करून मुबंईत येण्‍यास सांगितले. आपण शिवसेनेसोबत म्‍हणजे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यासोबतच राहणार असल्‍याचे सुरतमध्‍ये असलेल्‍या शिवसेनेच्‍या एका आमदाराच्‍या भावाने सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास शिवसेनेचे २९ आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. पक्षांतर बंदी कायदा असल्याने फुटलेल्या आमदारांची आमदारकी वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ३७ आमदार लागणार आहेत. ही जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात शिंदे आहेत.

शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायदा आसल्याने दोन तृतीयांश पेक्षा कमी संख्येने आमदार फुटले तर त्यांची आमदारकी जाऊ शकते. त्यामुळे या कायद्यातून सूट मिळण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ३७ आमदारांची गरज आहे. शिंदे यांना आणखी शिवसेनेच्या आठ आमदारांची गरज लागणार आहे. त्याची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत १३ आमदार गेल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्यासोबत १३ नाही तर २९ आमदार गेल्याने एकनाथ शिंदे यांचे बंड छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या बंडापेक्षाही मोठे बंड आहे

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT