Latest

वाशिम : बूट पॉलिश करत रामभाऊने चमकावले मुलाचे भविष्य : दीपक खंदारेची विक्रीकर निरीक्षकपदी निवड

अविनाश सुतार

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : घरात अठरा विश्व् दारिद्र्य… उदरनिर्वाह करण्याचा कोणताच मार्ग नाही… घरी वडिलोपार्जित शेती नाही… या परिस्थितीत कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी रामभाऊ सीताराम खंदारे पारंपरिक बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय करतात. मागील ४० वर्षांपासून वाशीम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते व्यवसाय करून आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिले. मुलगा दीपकने ही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

आपण जरी शिकलो नसलो, तरी मात्र आपल्या मुलांनी शिकावं, शासकीय नोकरी करावी हे स्वप्न उराशी बागळून आपला मुलगा दीपक याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रामभाऊ अहोरात्र मेहनत करीत होते. रामभाऊ यांची अर्धांगिनी व दीपकची आई तुळसाबाईही घरातील काम सांभाळून तेलाच्या घाण्यात काम करून संसाराला हातभार लावला. दीपकने स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत दीपकने अहोरात मेहनत करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. परंतु गेल्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाने थोड्या मार्कांने हुलकावणी दिली; पण खचून न जाता यावर्षी झालेल्या परीक्षेची त्याने जोरात तयारी केली. विक्रीकर निरीक्षक पद मिळवले. दीपकच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. दीपकने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई – वडिलांना दिले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT