Latest

Rain Update: राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; मराठवाडा विदर्भात यलो अलर्ट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मुंबईत विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली असून, पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  सध्या मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे.

गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, पूणे, अकोला, कोल्हापूर येथील परिसरात पाऊस झाला आहे. हवामान विभागाकडून आज विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड, पालघर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सप्टेंबर महिन्यात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं मान्सून यावर्षी देखील लवकर परतीचा प्रवास करणार नसल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT