Latest

Amritpal Singh arrested : अखेर अमृतपाल सिंहच्या मुसक्या आवळल्या; मोगा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amritpal Singh arrested : वारीस दे पंजाबचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक, 36 दिवसांपासून फरार अमृतपाल सिंहला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. मोगा पोलिसांसमोर अमृतपालने सरेंडर केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 36 दिवसांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत फरार असलेला अमृतपाल सिंह अखेर शरण आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंह याने शनिवारी रात्री उशिरा मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मोगा गुरुद्वारा येथून त्याने आत्मसमर्पण केले.

Amritpal Singh arrested : अमृतपाल सिंहवर काय आहेत आरोप?

अमृतपाल सिंह हा वारीस पंजाब दे चा प्रमुख आणि खलिस्तानचा समर्थक आहे. अमृतपालने 23 फेब्रुवारीला अजनाला पोलिस ठाण्यावर आपल्या जवळच्या साथीदाराला सोडविण्यासाठी हजारों समर्थकांसह हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. लवप्रीत तूफान या आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी त्याने आपल्या समर्थकांसह तलवार-लाठ्या घेऊन पोलिस ठाण्यावर धाबा बोलला होता.

या घटनेनंतर त्याने आपल्या अनेक टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील धमकी दिली होती. या अमृतपालची तुलना भिंडरावाले सोबत केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वारीस पंजाब दे च्या अनेक समर्थकांना अटक केली होती.

Amritpal Singh arrested : 18 मार्चपासून पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू होते

पंजाब पोलिसांनी 18 मार्चपासून अमृतपालला अटक करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र, प्रत्येक वेळा त्याने पोलिसांना चकवा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना उघड-उघड आव्हान दिले होते. एका व्हिडिओतून त्याने म्हटले होते की वाहे गुरुंच्या इच्छेशिवाय मला अटक करणे शक्य नाही. मध्यंतरी अमृतपाल गोरखपूर मार्गे नेपाळला पळाल्याच्या बातम्या देखील होत्या. दरम्यान, पंजाब हरियाणा कोर्टाने सुद्धा अमृतपालला पकडण्यात आलेल्या अपयशावरून पंजाब पोलिसांना फटकारले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT