Latest

आर्थिक संकट गडद! Vodafone चे सीईओ निक रीड यांचा राजीनामा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्थिक अडचणीत असलेली टेलिकॉम कंपनी व्होडाफोनला आणखी एक धक्का बसणार आहे. कंपनीचे सीईओ निक रीड (Vodafone CEO Nick) आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ब्रिटनमधील व्होडाफोन ग्रुपने सोमवारी सांगितले की कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड या वर्षाच्या अखेरीस पदावरुन पायउतार होतील. त्यांच्या जागी अंतरिम सीईओ म्हणून फायनान्स चीफ मार्गरेटा डेला वाले कामकाज सांभाळतील.

व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी निक रीड हे चार वर्षे उच्च पदावर राहिल्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडत आहेत, असे Vodafone ग्रुपने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रुपमध्ये २० वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर ते डिसेंबरच्या अखेरीस पायउतार होतील, असे एका निवेदनात पुढे नमूद केले आहे.

Vodafone ने अलीकडेच पहिल्या सहामाहीतील कमाईचे आकडे जाहीर केले होते. त्यात कंपनीचे कमाई स्थिर स्वरुपाची राहिली. त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण पहायला मिळाली. "मी बोर्डाशी सहमती दर्शवली आहे की व्होडाफोनला मजबूत स्थितीत आणू शकणार्‍या नवीन नेतृत्वाकडे पद सोपवण्याची हीच योग्य वेळ आहे," असे निक रीड यांनी निवेदनात म्हटले आहे.
चार वर्षाच्या सीईओ पदाच्या कार्यकाळात निक रीड यांनी व्होडफोनला कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युरोप आणि आफ्रिकेतील बाजारांवर फोकस वाढवण्यासाठी कंपनीची मालमत्ता विकली होती.

व्होडाफोनचे शेअर्स अद्याप घसरलेलेच आहेत. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये रीड यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स ४० टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत. सध्याची शेअसर्च पातळी दोन दशकांपूर्वीच्या पातळीवर आली आहे. गेल्या महिन्यातच व्होडाफोनने त्यांच्या जर्मनी, इटली आणि स्पेन या मोठ्या युरोपीय बाजारपेठांमधील वाढत्या ऊर्जेच्या किमतीचा हवाला देत पूर्ण वर्षातील उलाढाल कमी होणार असल्याचे संकेत दिले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT