भारत धर्मनिरपेक्ष : सर्वोच्‍च न्‍यायालय; श्री श्री ठाकूर अनुकुलचंद्र यांना ‘परमात्‍मा’ घोषित करण्‍याची याचिका फेटाळली | पुढारी

भारत धर्मनिरपेक्ष : सर्वोच्‍च न्‍यायालय; श्री श्री ठाकूर अनुकुलचंद्र यांना 'परमात्‍मा' घोषित करण्‍याची याचिका फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्‍ही येथे लेक्‍चर ऐकण्यासाठी आलेलो नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. अशा प्रकारच्‍या याचिकांना काही अर्थ आहे का, असे याचिकाकर्त्याला फटकारत सत्संगाचे संस्थापक श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्र यांना परमात्‍मा घोषित करण्‍यासाठी दाखल याचिका आज ( दि. ५ ) सर्वोच्‍च न्‍यायालयाने  फेटाळली. तसेच चुकीची याचिका दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

सत्संगाचे संस्थापक श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्र यांना परमात्‍मा घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका उपेंद्र नाथ दलाई यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती एम. आर. शहा आणि सी.टी. रवीकुमार यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

आम्‍ही येथे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेलो नाही, भारत धर्मनिरपेक्ष

आम्‍ही येथे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेलो नाही. आपला देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. अशा प्रकारच्‍या याचिकांना काही अर्थ आहे का, अशा शब्‍दात न्‍यायमूर्ती शहा यांनी याचिकाकर्त्याला फटकाले. श्री श्री ठाकुर अनुकुलचंद्रा यांना तुम्‍हाला देव मानायचे असेल तर तुम्‍ही मानू शकता मात्र तो इतरांवर लादला जाऊ शकत नाही. यामध्‍ये कोणी हस्‍तक्षेप करण्‍याचे कारणच नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. अशी मागणी जनहित याचिकांमध्ये केली जाऊ शकत नाही. असे न्‍यायालयने स्पष्ट केले.

हेही वाचा :

 

Back to top button