Latest

Nagpur News: हिंदू असाल, तरच गरबा खेळा, अन्यथा नो एन्ट्री: ‘विहिंप’चा फतवा

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  गरबा आयोजनात केवळ हिंदूनांच प्रवेश द्या. त्यासाठी आधार कार्ड तपासा, गोमूत्र अर्क पिण्यास द्या, पवित्र वातावरणात गरबा खेळा, ही शक्तीची भक्ती असून मौजमजा नाही, यातून लव्ह जिहाद सारखे प्रसंग ओढवू नयेत, अशी अफलातून मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्यामुळे इतर धर्मियांना गरबा खेळण्यास प्रतिबंध घातला जाणार का ?  अशी शंका बळावली आहे. नवरात्राच्या तोंडावर विहिंपच्या या अघोषित फतव्याने आयोजक, स्पर्धकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवण्याची भीती वाढली आहे. गरबा-दांडिया आयोजनस्थळी प्रवेशद्वारावर आधार कार्ड तपासून केवळ हिंदू धर्माच्या लोकांनाच आत जाण्यास परवानगी असावी, असे विहिंपचे म्हणणे आहे. (Nagpur News)

गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून ते फक्त नृत्य नाही. तसेच तो इव्हेंटही नाही. त्यामुळे गरबा आयोजनास्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांनी प्रवेश करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. (Nagpur News)

गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवीबद्दल भक्ती नसताना अनेक इतरधर्मीय तिथे केवळ मौजमजा म्हणन प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे यातूनच लव्ह जिहादसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच नियमावलीसह काळजी घ्यावी, असेही गोविंद शेंडे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. एवढेच नव्हे तर विहिंपने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्या अनेक मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि दरावरील व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे हे विशेष.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT