Latest

Virat Kohli Vs Shahid Afridi : विराट भावा तू विश्रांतीच घे, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची कामगिरी गेल्या काही काळापासून खराब राहिली आहे. नोव्हेंबर २०१९ ला विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील शेवटचे शतक झळकावले होते. भारतीय संघाच्या आणि आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहली कोणत्याही दडपणाखाली न येता चांगली कामगिरी करेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, अजूनही विराट कोहलीचा फॉर्म परत आलेला नाही. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आयपीएल २०२२ मध्ये विराट तीन वेळेस भोपळाही न फोडता बाद झाला. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Virat Kohli Vs Shahid Afridi)

आफ्रिदी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, क्रिकेट खेळताना दृष्टी अतिशय महत्वाची असते. विराट कोहलीला आपल्या क्रिकेट करियरमध्ये सर्वोकृष्ट फलंदाज बनायचे होते. सध्या विराट कोहली त्याच दृष्टीने क्रिकेट खेळतोय का? असा सवाल आफ्रिदीने यावेळी उपस्थित केला. जर विराट कोहलीला आपण सर्वोत्कृष्ट क्रिकेटर झालो आहोत आणि जीवनात बरेच काही मिळवले आहे. असे वाटत असेल तर मग त्याने आराम करावा, असा टोलाही यावेळी आफ्रिदीने लगावला. (Virat Kohli Vs Shahid Afridi)

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून आराम (Virat Kohli Vs Shahid Afridi)

आयपीएल दरम्यान, विराट कोहलीला अनेक माजी खेळाडूंनी काही काळ आराम करण्याचा सल्ला दिला होता. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कोहलीला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीने आराम घेतला आहे. विराट नुकताच मालदीवमधून भारतात परतला आहे. यानंतर कोहली जुलैमध्ये इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला सामना जुलैमध्ये खेळवण्यात येणार आहे. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT