पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Captaincy : विराट कोहली (Virat Kohli) 15 जानेवारी रोजी टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. ट्विटरवरून त्याने आपला राजीनामा जग जाहीर केला. त्याच्या या खळबळजनक निर्णयाने क्रिकेट विश्व हादरून गेले. विराटच्या चाहत्यांनी तर बीसीसीआय आणि बोर्डाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यावर जोरदार टीका केली असून दोघांच्या दबावाला कंटाळून विराटने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. (Virat Kohli Captaincy)
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराटने (Virat Kohli) 68 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे आणि 40 विजयांसह तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीने ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून कसोटीचे कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली. याआधी विराट कोहलीनेही टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या टी 20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. तर द. आफ्रिका दौ-यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समीतीने त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले. (Virat Kohli Captaincy)
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी (15 जानेवारी) संध्याकाळी ट्विट करून अचानक कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. कोहलीचा हा निर्णय चाहत्यांना आणि क्रीडा जगतातील लोकांना धक्कादायक ठरला आहे. पण कोहलीने या निर्णयाची पूर्ण तयारी केली होती. (Virat Kohli Captaincy)
वास्तविक, कोहलीने हा निर्णय सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सांगितला होता. यानंतर त्याने हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना सांगितला. या सर्व प्रकारानंतर कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना राजीनाम्याची माहिती जाहीरपणे दिली. (Virat Kohli Captaincy)
सूत्रांच्या महितीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत शुक्रवारी (१४ जानेवारी) टीम इंडियाचा पराभव झाला. सामना संपल्यानंतर कोहली (Virat Kohli) मुख्य प्रशिक्षक द्रविड यांना भेटला आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यादरम्यान दोघांमध्ये कसोटी मालिकेतील पराभवाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोहलीने द्रविड यांना दिली.
द्रविड यांच्याशी बोलल्यानंतर विराट कोहलीने शनिवारी दुपारी बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन केला. यादरम्यान कोहलीने जय शहा यांना आपला निर्णय सांगितला. फोनवर बोलत असताना जय शहा यांनी कोहलीचा निर्णय मान्य केला. यानंतर संध्याकाळी कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबत ट्विट केले. (Virat Kohli Test Captaincy)
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले की, 'विराट कोहलीने सचिव जय शहा यांना माहिती दिली. त्याच्या निर्णयाचा बोर्ड आदर करतो. जेव्हा त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले तेव्हा बोर्डाने वर्ल्ड कपपर्यंत कर्णधारपदी राहण्याचे सांगितले होते, परंतु त्याने आपला निर्णय घेतला होता. कोहली हा भारतीय कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो', असेही त्यांनी म्हटले. (Virat Kohli Test Captaincy)
कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत. त्याच्यानंतर धोनीचे नाव आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 60 पैकी 27 कसोटी जिंकल्या. अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुखापतीमुळे कोहली मालिकेतील दुसरी कसोटी खेळू शकला नव्हता. (Virat Kohli Test Captaincy)