Latest

विराट कोहलीने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यायला हवी : ब्रेट ली

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने काही काळ क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी, कोहलीला मनाने तंदुरूस्त रहायचे असेल तर त्याला विश्रांतीची गरज आहे. विश्रांतीनंतर तो दमदार कामगिरी करू शकेल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने म्हटले आहे. तसेच विराटने पुढेही चांगली कामगिरी करावी, अशीच माझी इच्छा असल्याचेही ब्रेट ली म्हणाला.

राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने पराभव केल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलचा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर ब्रेटलीने विराटबद्दल मत व्यक्त केले आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या तीन वर्षात एकही शतक झळकावू शकलेला नाही. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

विराटने आयपीएल २०२२ मध्ये १६ सामने खेळत फक्त ३४१ धावा केल्या आहेत. राजस्थान विरूद्धच्या सामन्यातही विराट ८ चेंडूमध्ये ७ धावा करत स्वस्तात माघारी परतला. सध्याच्या घडीला टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली पेक्षा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस हा चांगला फलंदाज असल्याचेही यावेळी ब्रेट ली म्हणाला आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजीने प्रभावीत : ब्रेट ली

यंदाच्या आयपीएलमधून आवेश खान, मोहसीन खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यासारखे चांगले वेगवान गोलंदाज पुढे आले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करू शकतील, असेही यावेळी ब्रेट ली म्हणाला.

उमरान मलिकने टेस्ट क्रिकेटकडेही लक्ष्य द्यावे

उमरान मलिक सातत्याने १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो. त्याला अशी गोलंदाजी करताना पाहून चांगले वाटते. मला आशा आहे की, त्याला टेस्ट क्रिकेटमध्येही खेळण्याची संधी मिळेल, असे मत ब्रेट लीने यावेळी व्यक्त केले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT