Latest

Virat and Anushka : मुंबईत विराट-अनुष्‍काने फ्‍लॅट घेतला भाड्याने ! भाडे ऐकला तर थक्‍क व्‍हाल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील जुही परिसरात एक अलिशान
फ्‍लॅट भाड्याने घेतला आहे. ( Virat and Anushka )

Virat and Anushka : साडेसात लाख रुपये डिपॉझिट, २.७६ लाख रुपये भाडे

एका रिपोर्टनुसार, विराट आणि अनुष्‍का यांनी इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावरील अलिशान फ्‍लॅट भाड्याने घेतला आहे. ६५० चौ.मीटर असणार्‍या या प्‍लॅटचे महिन्‍याचे भाडे २.७६ लाख रुपये इतके आहे. तसेच त्‍यांनी साडेसात लाख रुपये डिपॉझिट भरले आहे. विराटने भाड्याने घेतलेला फ्‍लॅट हा माजी क्रिकेटपटू समरजीत सिंह गायकवाड यांचा आहे. या नवीन आणि अलिशान फ्‍लॅटमधून समुद्र दर्शनाचा आनंद मिळतो, यासाठी विराट आणि अनुष्‍काने हा फ्‍लॅट निवडला आहे.

वरळी आणि वर्सोवामध्‍येही फ्‍लॅट

अनुष्‍का शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑक्‍टोबर महिन्‍यात गायक किशोर कुमार यांचा मुंबईतील बंगला भाड्याने घेतला होता. या बंगल्‍यात त्‍यांनी रेस्‍टॉरंट सुरु केले आहे. तसेच त्‍यांनी वरळी येथील ओमकार अपार्टमेंटमध्‍ये ३५ व्‍या मजल्‍यावरील फ्‍लॅट खरेदी केला आहे. रिपोर्टनुसार, या अलिशान फ्‍लॅटची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये आहे. त्‍यांनी वर्सोवामध्‍येही एक फ्‍लॅट खरेदी केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT