Latest

Virat Anushka : अनुष्का माझ्यासाठी प्रेरणादायी – विराट

अमृता चौगुले

मुंबई; वृत्तसंस्था : विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्काचे भरभरून कौतुक केले आहे. 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'च्या पॉडकास्टदरम्यान त्याने सांगितले की, अनुष्का नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी असून एक आई या नात्याने तिने केलेला त्याग अवर्णनीय आहे. (Virat Anushka)

तो म्हणाला, आम्हाला एक मुलगी आहे आणि एक आई म्हणून अनुष्काने जो त्याग केला ती खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही प्रेरणा शोधता तेव्हा तुम्ही घरापासून सुरुवात करता. साहजिकच अनुष्का माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. माझा जीवनाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. (Virat Anushka)

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही एका बदलाच्या प्रक्रियेत जाण्यास सुरुवात करता. अनुष्काचा जीवनाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे मला अधिक चांगल्याप्रकारे गोष्टी स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. दुसरे म्हणजे मी कधी कधी पटकन रागावतो. मात्र, मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT