Latest

सर्व नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा : विजय वडेट्टीवार यांचा स्वकियांना सल्ला

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : स्वबळावर सत्ता कुणाचीच येत नाही, तडजोड करावी लागते, राजकारणात सर्वांचे दुकान हे काचेचं असते. सर्वांनी तडजोड आणि संयम ठेवून बोलावं, तोडण्याची नाही जोडण्याची भाषा करावी, सर्व नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा, असा सबुरीचा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला.

स्थानिक पातळीवर बिन चिन्हाच्या निवडणुका असतात. आपसात ताळमेळ साधून तडजोड केल्या जातात. चंद्रपूरमध्ये जाणीवपूर्वक कारवाई झाली का ? हे बघावे लागेल. अनेक ठिकाणी भंडारा, गोंदियासह अशा अभद्र युत्या झाल्या आहेत. मग सगळ्याच ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. मुळात सत्य लपवून ठेवता येत नाही, रिव्हेंज पोलिटिक्स होऊ नये, सत्तेसाठी रिव्हेंज राजकारण करु नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.

मविआत कुठलेही मतभेद नाहीत, आम्ही परस्परांना फेव्हीकॉलने जोडून घेत पुढे जाऊ. कोणत्याही पक्षाची स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नाही. सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा या सरकारच्या विरोधात राहील, असेही ते म्हणाले. आज स्वबळावर सत्ता आणण्याची ताकद कोणाचीच नाही. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

कर्नाटकची निवडणूक विकासापासून दूर जात जाती धर्मावर गेली आहे. कर्नाटकात पैश्याचा अमाप वापर झाला. ३८ सभा पंतप्रधान यांनी कर्नाटकमध्ये घेतल्या. मात्र, यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेसच जिंकणार आहे. अनेक भाजपमधील नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बजरंगबलीचा आधार घेतला. पण भाजप निवडणूक जिंकणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT