नागपूर : शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्‍यानंतर राष्‍ट्रवादीच्या कार्यालयात जल्‍लोष | पुढारी

नागपूर : शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्‍यानंतर राष्‍ट्रवादीच्या कार्यालयात जल्‍लोष

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्‍याचे जाहीर केले. यानंतर नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख या घडामोडीत मुंबईत आहेत. पवार यांची राज्याला आणि देशाला गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे, रमण ठवकर, श्रीकांत शिवणकर, श्रीकांत घोगरे, अरविंद भाजीपाले, प्रशांत बनकर, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंग, आशुतोष बेलेकर, रूद्रा धाकडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला तसेच मिठाई वाटत गुलाल उधळला.

हेही वाचा :  

Back to top button