Latest

Video : अभिमानास्पद! लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे वाचला दोन महिलांचा जीव

अविनाश सुतार

जम्मू काश्मीर; पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडजवळ चित्तो मातेच्या यात्रेसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांच्या सतर्कतेमुळे काल (दि.५) दोन महिलांचा जीव वाचला. या घटनेने जवानांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी, १७ राष्ट्रीय रायफल्स (मराठा LI) च्या तुकड्या जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या पद्दार भागात चित्तो मातेच्या यात्रेला सुरक्षा पुरवत होते. मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांना दुरून आरडाओरडा ऐकू आला. यावेळी जवानांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊन पाहणी केली असता दोन महिला अत्यवस्थ असल्याच्या दिसून आल्या. त्यातील एका महिलेला रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने श्वास घेत नव्हता तर दुसरी महिला पायाला गंभीर जखम झाल्याने अत्यावस्थ होती. यावेळी जवानांनी त्या महिलांना तात्काळ प्राथमिक उपचार देऊन चंद्रभागा नदी पार करून अठोली येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. या भागात अतिशय प्रतिकूल हवामान आणि अवघड भूप्रदेश असूनही जवानांच्या दक्षतेमुळे त्या महिलांचा जीव वाचला. जवानांच्या निस्वार्थी आणि धाडसी कृत्यामुळे यात्रेकरूंमधून व नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही नक्की वाचा…

SCROLL FOR NEXT