कोरोनाच्या व्हेरियंटचे होणार तासात निदान | पुढारी

कोरोनाच्या व्हेरियंटचे होणार तासात निदान

वॉशिंग्टन : कोरोनाला येऊन तीन वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याचा जगभरातील प्रकोप अद्यापही सुरूच आहे. आता तर या विषाणूचा संसर्ग पसरण्याचा वेग आणखी वाढू लागला आहे. गंभीर बाब म्हणजे पश्चिमात्य देशात या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनी दार ठोठावण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहिल्यास नव्या व्हेरियंटचा शोध लागण्यास यापूर्वी अनेक दिवस लागत होते. मात्र, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी असा एक पर्याय विकसित केला आहे की, त्याच्या मदतीने कोरोनाच्या तमाम व्हेरियंटचा शोध अवघ्या तासाभरात लागणार आहे.

शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोणत्याही व्हेरियंटचा शोध अवघ्या एका तासाभरात एका रॅपिड टेस्टच्या मदतीने लागू शकतो. या टेस्टला उेतरीडलरप असे नाव देण्यात आले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’च्या संशोधकांनी उेतरीडलरप च्या सुमारे चार हजार नमुन्यांची चाचणी घेतली.

‘क्लिनिकल केमिस्ट्री’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, उेतरीडलरप च्या मदतीने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अवघ्या तासाभरात शोध लावला जाऊ शकतो. उेतरीडलरप च्या आतापर्यंतच्या चाचण्यांचे परिणाम अचूक मिळाले आहेत.

Back to top button