New Variant : महाराष्ट्रासह १० राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; इस्राईलच्या शास्त्रज्ञांचा दावा | पुढारी

New Variant : महाराष्ट्रासह १० राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव; इस्राईलच्या शास्त्रज्ञांचा दावा

पुढारी ऑनलाईन : एका इस्राईलच्या शास्त्रज्ञाने भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्याने हा दावा करताना म्हटले आहे की, भारतातील साधारण दहा राज्यांमध्ये BA.2.75 या नव्या कोरोना व्हेरिएंटचे रूग्ण आढळले आहेत. इस्राईलच्या शास्त्रज्ञाच्या या धक्कादायक माहितीच्या खुलास्याने सरकारची चिंता वाढली आहे.

ईस्रायलमधील शास्त्रज्ञ डॉ. शाय फ्लेशॉन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतातील किमान १० राज्यांमध्ये BA.2.75 हा कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट पसरला आहे. या नवीन व्हेरिएंट भारतासह ७ इतर देशांमध्येदेखील पसरला आहे. शास्त्रज्ञांनी 2 जुलै 2022 रोजी केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्ये कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचे ६९ रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये २७, पश्चिम बंगालमध्ये १३, हरियाणामध्ये ७, हिमाचल प्रदेशमध्ये ३, दिल्ली, जम्मू आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळले आहेत.

आयएएनच्या रिपोर्टनुसार डॉ. शॉल फ्लेशॉन यांच्या मते या व्हेरिएंटबाबत अजून अभ्यास सुरू असून तो किती धोकादायक आहे, ते सध्या स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण सुरुवातीच्या लक्षणांवरून हा जीवघेणा असल्याचे दिसते आहे तसेच तो शरीरात वेगाने पसरतो आणि अवयवांना हानी पोहोचवतो, असे लक्षात आले आहे.

पाहा व्हिडिओ: मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल- डॉ. मोहित गुप्ता

Back to top button