Latest

MS Dhoni Bike and Car Collection : रांचीत धोनीचे बाईक आणि कार कलेक्शन पाहून व्यंकटेश प्रसाद आश्चर्यचकीत; म्हणाला, हे तर…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या महागड्या कार आणि बाईकच्या कलेक्शनची माहिती सर्वांना असेलच. त्याचे बाईकप्रेम जगजाहीर आहेचं. धोनीकडे सर्व प्रकारच्या जुन्या आणि आधुनिक बाईक आहेत. त्याच्या बाईक कलेक्शनचा आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्यंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी यांनी धोनीच्या रांची येथील घरी भेट दिली. यावेळी व्यंकटेश प्रसाद धोनीचे बाईक आणि कारचे कलेक्शन पाहून आश्चर्यचकीत झाले. त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि हे तर बाइकचे शोरूम असू शकते, असे सांगितले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, "मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण आवड आहे. काय कलेक्शन आहे! MSD माणूस म्हणजे एक महान कर्तृत्ववान आणि अविश्वसनीय व्यक्ती आहे. त्याच्या रांचीतील घरातील बाईक आणि कारच्या कलेक्शनची ही एक झलक आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT