Latest

Vastu shastra : एक वाटी मीठ दूर करेल तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Vastu shastra : तुमच्या आयुष्यात सातत्याने काही ना काही नकारात्मक घडत आहे का? नकारात्मकतेने घेरल्यामुळे तुम्हाला सातत्याने थकवा जाणवतो का? तुम्ही आयुष्यात निरुत्साही झाला आहात का? मग तुमच्यासाठी ही बातमी निश्चितच उपयोगी ठरू शकते. कारण आयुष्यातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा संपवण्याचा अगदी साधा सोपा आणि कमी खर्चाचा हा उपाय येथे देण्यात आला आहे. वास्तूशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जेचा संचय झाल्यास त्याचा त्या घरात राहणा-या सर्व व्यक्तींच्या शरीर आणि मनावर परिणाम होतो. हा परिणाम दूर करण्याचा अतिशय साधा उपाय आहे तो म्हणजे, 'एक वाटी मीठ'.

Vastu shastra : हो वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता तुम्हाला घालवायची असेल तर एक वाटी मीठ तुमची मदत करेल. मात्र, हे मीठ दररोज तुम्ही जे वापरता ते नाही. खडे मीठ किंवा सेंधे मीठ किंवा समुद्री मीठ असेही याला म्हणतात.
वास्तू शास्त्रानुसार खडे मीठ हे ऊर्जा संतुलनासाठी वापरले जाते. तसेच आयुष्यात समृद्धी भरभराट आणण्यासाठी देखील केला जातो. खडे मीठ किंवा सेंधे मीठ यांना पर्यावरण शोधक मानले जाते. यामध्ये आजूबाजूच्या पर्यवरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे गुण असतात. त्यामुळे या मीठाच्या वापरामुळे घर, आत्मा आणि शरीराचे शुद्धीकरण करतो. त्यामुळे तुमच्या घरात आणि आयुष्यात सकारात्मकता येते. ज्यामुळे तुम्ही उत्साहाने कार्य करू लागता.

Vastu shastra : असा करा मीठाचा वापर…

1. घरातील प्रत्येक खोलीत एका कोप-यात खडे मीठ एका वाटीत ठेवा. काही जण यामध्ये पाणी घालून ठेवण्याचा सल्ला देतात. तर काहींच्या मते फक्त खडे मीठच ठेवावे. हे खडे मीठ एक प्रकारचे स्फटिक असल्याने ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे कार्य करते. मात्र, हे मीठ दर आठ दिवसांनी आठवणीने बदलावे. महत्वाचे हे मीठ तुम्ही बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये फ्लश करून टाकावे. मात्र स्वयंपाक घरातील बेसिनमध्ये हे फ्लश करू नये.

2. तुम्हाला तुमच्या कामात मनासारखे परिणाम हवे असल्यास रोज सकाळी पांढरे खडे मीठ घेऊन शरीरावरून पाच ते सात वेळा फिरवावे. नंतर त्याला पाण्यात वाहून टाकावे. यामुळे तुमच्या शरीराभोवती साचलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. तुम्हाला कामात उत्साह जाणवेल.

3. तुमच्या शरीरा भोवती असलेल्या आभा मंडलातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी 15 दिवसातून एकदा खडे मीठ पाण्यात घालून त्याने आंघोळ करावी.

4. घरात फरशी पुसताना दर दोन दिवसांनी हे खडे मीठ पाण्यात घालून त्या पाण्याने फरशी पुसाावी.

5. आपल्या घरात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा ही घरातील बाथरूममध्ये आणि शौचालयात साचते. त्यामुळे एका कोप-यात तुम्ही हे खडे मीठ एका वाटीत भरून ठेवावे. ते सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. तसेच अन्य वास्तुदोष असतील तर ते देखील निघून जातील. हे मीठ वेळोवेळी बदलून बाथरूममध्ये फ्लश करून टाका.

6. घरातील भांडी देखील दर आठ दिवसांनी खड्या मीठाच्या पाण्याने धुवून काढावी. यामुळे जेवताना देखील सकारात्मकता येईल.
वरील सर्व माहिती वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांच्या मतानुसार देण्यात आली आहे. पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही. उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला अवश्य घ्यावा…

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT