Latest

Vardha News : वाघोडा दरोडा प्रकरण; तीन आरोपींना अटक, वाहन जप्त

सोनाली जाधव
वर्धा, पुढारी वृत्तसेवा : कारंजा घाडगे तालुक्यातील वाघोळा शिवारात फार्म हाऊस मध्ये दरोडेखोरांनी दरोडा घालत एक लाख 94 हजारांचा मुद्देमाल पळविला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत तीन जणांना अटक करत एक वाहनही जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. (Vardha News)
नागपूर येथून नारायणदास पालीवाल, नारायण पालीवाल यांची पत्नी व मुलगा गोपाल पालीवाल असे सुट्टी असल्याने नागपूर वरुन कारंजा (घाडगे) तालुक्यातील वाघोडा येथील शेतातील फाॅर्म हाऊसवर मुक्कामी आले होते. अनोळखी आरोपींनी नारायण पालीवाल यांचे फार्म हाऊसवर जावुन गोपाल पालीवाल यास मारहाण करुन व चाकुचा वार करुन गंभीर जखमी केले. आरोपींनी मंगळसुत्र, कानातले व तीन मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेतले. सर्वांना खोलीत कोंडुन शेजारील खोलीतील सोयाबीन धान्याचे ५५ कटटे असा १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल दरोडा टाकुन वाहनात घेवुन पसार झाले. तक्रारीवरून कारंजा (घाडगे) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (Vardha News)

Vardha News : तीन आरोपींना अटक, वाहन जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु करण्यात आला. समांतर तपासात मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून हा गुन्हा हा तरोडा, मार्डा, चांदुररेल्वे, जि. अमरावती येथे राहणारे सहा गुन्हेगारांनी घटनास्थळी जावुन केल्याचे पुढे आले. पोलिसांनी सागर रतन पवार (वय 38) रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती यास तो मुंबई येथे पळुन जाण्याचे तयारीत असताना अंत्यत शिताफीने अकोला रेल्वे स्टेशन येथुन ताब्यात घेतले. दीपक रतन पवार (वय 32), दोन्ही रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती यास धारणी ते परतवाडा रोडवरील आर.टी.ओ.टोल नाका येथे नाकाबंदी करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. मनोज नशोक पवार (वय 32), रा. मौजा तरोडा, ता. चांदुररेल्वे, जि. अमरावती यास त्याने सदर गुन्हा करण्याकरीता वापर केलेल्या त्याच्या मालकीच्या एमएच 27 बीएक्स 7290 क्रमांकाच्या वाहनासह चांदुर रेल्वे येथुन ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला विचारपुस केली असता तिन्ही आरोपींनी प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगितले. त्यावरून सदर गुन्ह्यात तीन आरोपींना मालवाहू वाहनासह अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी खंडेराव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, कारंजा (घाडगे) पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या निर्देशानुसार पो. उपनि. अमोल लगड, सलाम कुरेशी, उमाकांत राठोड, एएसआय मनोज धात्रक, नरेन्द्र पाराशर, संजय बोगा, चंदु बुरंगे, पवन पन्नासे, अरविंद येणुरकर, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, नितीन इटकरे, मनिश कांबळे, रामकिसन इप्पर, संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, विनोद कापसे, अभिषेक नाईक, अरविंद इंगोले सायबर शाखेचे दिनेश बोथकर, अनुप कावळे, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT