Latest

Vande Bharat Express : ‘वंदे भारत’ प्रत्येक राज्यात; स्वातंत्र्य दिनापर्यंत ७५ गाड्या सुरू करण्याची मोदी सरकारची योजना

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने स्वातंत्र्य दिनापर्यंत '७५ वंदे भारत' गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्येक राज्यासाठी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही पहिली स्वदेश निर्मित अर्ध-हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी अनेक नवीन सोयी सुविधांनी अद्ययावत आहे. तसेच भारतीय रेल्वेच्या दृष्टीने ती परिवर्तनाची नांदी आहे.

Vande Bharat Express : प्रत्येक राज्याला 'वंदे भारत' एक्सप्रेस

राष्ट्रीय वाहतूकदार या वर्षाच्या सुरुवातीपासून दर महिन्याला निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्या सुरू करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, रेल्वेने 29 मे पर्यंत सात ट्रेन सुरू केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्येक राज्यात नवीन युगाची ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत अशा ७५ गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. राष्ट्रीय वाहतूकदार येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्गांवर निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्या सुरू करणार आहे. रांची-हावडा, पाटणा-हावडा, मुंबई-मडगाव आणि अन्य अनेक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे.

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसचे उत्पादन वाढवले

भारत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहोत. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रत्येक राज्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. त्या दृष्टीने वंदे भारत एक्सप्रेसचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात रेल्वेने सेमी-हाय स्पीड गाड्यांचे उत्पादन वाढवले आहे. सध्या कारखान्यातून दर आठव्या किंवा नवव्या दिवशी एक नवीन गाडी येत आहे. रायबरेली-आधारित मॉडर्न कोच फॅक्टरी आणि लातूर-आधारित मराठवाडा रेल कोच फॅक्टरी या दोन कारखान्यांमध्ये उत्पादन कार्य सुरू करण्यासाठी प्रयत्न जोरात सुरू आहेत. सध्या या ट्रेनचे उत्पादन चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे केले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, रेल्वेवरील संसदीय स्थायी समितीने राष्ट्रीय वाहतूकदारांना लक्ष्य आणि रेल्वे प्रवाशांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या नवीन ट्रेनचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे.

Vande Bharat Express : इशान्य भारताला मिळाली पहिली वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ईशान्येत दाखल झालेली ही पहिली वंदे भारत ट्रेन आहे. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह गुवाहाटी रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT