Latest

Valentine Day Special : हार्ट सॉफ्ट टेडी, माय हार्ट कार्डला पसंती!

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रिय व्यक्तीसमोर मनातील इच्छा, आकांक्षा व्यक्त करतानाच त्याला गिफ्ट वस्तू देऊन आपलेसे करताना व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ग्रीटिंग कार्डची कमी झालेली मागणी आणि वाढती ऑनलाईन खरेदी यामुळे बाजारात गर्दी कमी झाली असली तरी यंदाच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारपेठेत हार्ट सॉफ्ट टेडी तसेच स्माईल' 'माय हार्ट' आदी ग्रीटिंग्ज कार्डला तरुणाईची पसंती होती. ( Valentine Day Special )

संबंधित बातम्या 

दरवर्षी व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. यंदा बाजारपेठेचा आढावा घेतला असता आय लव्ह यू, लव, 'स्वीट', हॅप्पी हार्ट सॉफ्ट अशा नावाच्या टेडी व व्हॅलेंटाईन डेसाठी खास बनविलेले वैविध्यपूर्ण ग्रिटींग्ज तसेच गिफ्ट वस्तू शॉपीमध्ये उपलब्ध असल्याचे दिसून आले.

विशेषत: यंदा तरुणाईकडून हार्ट सॉफ्ट टेडीला पसंती असल्याचे काही गिफ्ट शॉपी मालकांकडून सांगण्यात आले. बाजारात स्वीट हार्ट लव यू, स्माईल व माय हार्ट अशा विविध प्रकारात आणि 20 रुपयांपासून ते 250 रूपयांपर्यंत ग्रीटिंग्ज कार्ड उपलब्ध असल्याचेही दिसून आले. कांदिवली पूर्व गिफ्ट शॉपी मालक प्रवीण पाटील म्हणाले, व्हॅलेंटाईन डे पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात साजरा होताना दिसून येत आहे. या दिवसाचे दिवसेंदिवस महत्त्व कमी होत चालले आहे.

त्यामुळे साहजिकच व्हॅलेंटाईन डेचे गिफ्ट घेण्यासाठी ग्राहकांची संख्या घटली आहे. गिफ्ट वस्तूला मागणी कमी होत असल्याने या वस्तूचे दर यंदा जैसे थे आहेत. अर्थात, नियमित हा दिवस साजरा करणार्‍या तरुणाईकडून मात्र यंदाही खरेदी होताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहक कमी असले तरी तरुणाईचा खरेदीचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसते.

दृष्टिक्षेपात –

लव्ह स्वरूपाचे टेडी बेअर – 50 ते 350 रुपयांपर्यंत
टेडी बेअर मोठे – 700 रूपये
पांडा टेडी बेअर – लहान 90 रुपये, मोठे 700 रूपये
हार्ट सॉफ्ट टेडी -90 पासून 300 रुपयांपर्यंत
हार्ट सॉफ्ट टेडी मोठे -100 ते 250 रूपये
बीअर ग्लासचा शो पीस -699 रूपये
स्वीट, लकी फ्रेम – 99 ते 199 रुपये

ऑनलाईनकडे ओढा

वेळ वाचावा व वस्तू किंवा साहित्य घरपोहोच मिळावे, यासाठी बहुतांश: ग्राहक ऑनलाईन खरेदी करतात. अनेकजण व्हॅलेंटाईन डेची शॉपिंगही ऑनलाईन करीत असल्याने गिफ्ट शॉपीत ग्राहक कमी झाल्याचे काही शॉपी मालकांकडून सांगण्यात आले. ( Valentine Day Special )

SCROLL FOR NEXT