Latest

मलायका-अर्जुन कपूरचं बंद खोलीत ‘इजहार-ए-इश्क’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेता मलायका-अर्जुन कपूरने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. याआधी मलायका-अर्जुन कपूरने कधीच असा फोटो शेअर केला नव्हता. त्यांचा हा रोमँटिक फोटो असून व्हॅलेंटाईन डे च्या औचित्याने तो शेअर करण्यात आलाय. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.

काही युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ❤️ beautiful couple ❤️ म्हणत नेटकऱ्यांनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. Fabulous couple ?❤️❤️ , God bless you both , happy velentine day ?❤️ असे इमोजी शेअर केल्या आहेत.

बंद खोलीत रोमान्स

हा फोटो पोस्ट केल्यानंतर काहीच वेळात दोघांचा फोटो व्हायरल झाला. फोटोमध्ये दोघे एकमेकांना आलिंगन देताना दिसताहेत. त्यानेने लोअर आणि टी-शर्ट घातला आहे. तर मलायका केवळ शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसत आहे. ब्लॅक ॲण्ड व्हाईटमध्ये दोघांचे आउटफिटचे कॉम्बिनेशन कमालचे दिसत आहे.

सुपर बोल्ड मलायका

मलायकाने फोटो पोस्ट करत लिहिलं आहे-'माझा'. मलायकाच्या या एका शब्दाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये एक हार्ट इमोजीदेखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोला काही मिनिटांतच लाखों लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेक सेलेब्रिटीजदेखील कमेंट करत आहेत.

पहिल्यांदाच शेअर केली रोमँटिक फोटो

अर्जुन-मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे एकत्र सुट्टीला देखील जातात. पण, इतका खासगी फोटो तिने कधीच सार्वजनिक केला नव्हता. आता तिने रोमँटिक फोटो शेअर करून दोघांचे नाते पुन्हा एकदा कन्फर्म केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT