Latest

फू बाई फू : वैदेही परशुरामी होस्ट करणार कॉमेडी शो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही हसणार पोट धरून… कारण इथे होणार भरभरून, असा टीव्ही शो परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिथे असाल तिथे हसाल! अशी टॅगलाईन देत छोट्या वाहिनीवर फू बाई फू हा शो येणार आहे.

हा शो नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहे. फू बाई फू या कार्यक्रमाचे तब्बल १४ भाग प्रदर्शित झाले होते. आता ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा झी मराठी घेऊन येत आहे. कॉमेडीचा एक नवीन तडका 'फुू बाई फुू' हा कार्यक्रम. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच काही नवे कलाकारदेखील या कार्यक्रमात असणार आहेत.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार आहे. परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत. या कार्यक्रमात हास्याची धमाल उडवून देणारे कलाकार कोण असणार आहेत याचीच चर्चा होताना सध्या दिसत आहे.

SCROLL FOR NEXT