Latest

उत्तराखंड : भाजपा- काॅंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार धामी-रावत या दोघांचाही पराभव  

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी भाजपाने पुष्कर सिंह धामी यांना, काॅंग्रेसने माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना आणि आपने अजय कोठियाल यांना उमेदवार घोषीत केलेले होते. या उमेदवारांनी जिंकण्यासाठी जोरदार तयारीदेखील केलेली होती. पण, धामी आणि रावत या दोन्ही मुख्यमंत्री पदाच्या दावेदार उमेदवारांचा उत्तराखंडमध्ये पराभव झालेला आहे. राज्यात भाजपा आघाडीवर असली तर, त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पराभूत झालेला आहे. काॅंग्रेसचाही उमेदवारांचा १४ हजारांनी पराभव झालेला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे पुष्कर सिंग धामी यांना ३३,११५ म्हणजे ४३.७५ टक्के इतके मतदान झाले असून हरिश रावत यांना २८.०४६ म्हणजेच ३३.२६ टक्के मतदान झाले आहे. २०१७ मध्ये भाजपला ५६ जागा मिळाल्या होत्या, यावेळीही तो आकडा अजून मिळवता आलेला नाही. तसेच ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे हरिश रावत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राजकीय वाटचाल थांबणार का, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.

पराभव झालेले भाजपाचे उमेदवार धामी कोण आहेत?

पुष्कर सिंह धामी हे सध्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. खटीमा (उधमसिंह नगर) मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले पुष्कर सिंह धामी राज्याचे ११ वे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म पिथौरागढमधल्या टुण्डीमध्ये झाला.

शालेय जीवनापासूनच त्यांना राजकारणाची ओढ होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. उत्तराखंडची निर्मिती केल्यानंतर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून २००२ पर्यंत काम पाहिले होते.

उत्तराखंडमधील सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यांना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातात. भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री असताना पुष्कर धामी त्यांचे ओएसडी होते. पुष्कर धामी यांनी आजवर कोणतंही मंत्रिपद सांभाळलेलं नाही.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT