पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुम्हाला अमेरिकेला लवकर जायचं असेल आणि तुमच्याकडे अमेरिकेचा व्हिसा नाही आहे. तर आता काळजी करण्याची गरज नाही आहे. लवकरच तुम्ही अमेरिकेला जावू शकणार आहात. अमेरिकेच्या व्हिसासाठी तुम्ही आता अन्य देशातील यूएसच्या दुतावासातूनही तुम्हाला अर्ज करता येणार आहे. कारण भारतात व्हिसा मुलाखतीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. कारण पहिल्यांदाच अमेरिकेत जाणारे अर्जदार मुलाखतीच्या प्रक्रियेत येत नाहीत. ज्यांच्या व्हिसाची मुदत चार वर्षांपूर्वी संपली आहे ते भारतातील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी परदेशातील निवडक यूएस दूतावासांमध्ये अर्ज करू शकतात. वाचा सविस्तर बातमी. (US Visa )
मुलाखतीची प्रतीक्षा वेळ ही प्रत्येक देशात वेगवेगळी पाहायला मिळते. जसे की बँकॉकमध्ये B1/B2 व्हिसा मिळविण्यासाठी मुलाखतीची प्रतीक्षा वेळ फक्त 14 दिवस आहे. तर भारतात कोलकात्यात ५८९ दिवस आणि मुंबईत ६३८ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव अनिल कलसी म्हणाले की, ज्या भारतीयांना तातडीने अमेरिकेला जाण्याची गरज आहे ते अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अन्य देशांमध्ये जात आहेत कारण भारतात लांब प्रतीक्षा यादी आहे. उदाहरणार्थ, बँकॉकमधील यूएस दूतावासाने येत्या काही महिन्यांत थायलंडमध्ये असणार्या भारतीयांसाठी B1/B2 अपॉइंटमेंट क्षमता उघडली आहे," असे दिल्लीतील यूएस मिशनने शुक्रवारी सांगितले.
यूएस दूतावासाने सांगितले होते की यूएस व्हिसा इच्छुक आता 'ड्रॉप बॉक्स'द्वारे अर्ज सादर करू शकतात. यानंतर भारतातील अधिक अर्जदारांना मुलाखतीत सूट मिळण्यास पात्र ठरविण्यात आले आहे. मुंबईतील B1/B2 व्हिसा अर्जदारांची संख्या 638 असल्याने, मुलाखतीची प्रतीक्षा वेळ खूपच कमी झाली आहे. चेन्नईमध्ये 617 B1/B2 व्हिसा अर्जदार आहेत, हैदराबादमध्ये 609, दिल्लीत 596 आणि कोलकात्यात 589 आहेत.
ते म्हणाले की, या देशांमध्ये सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनामचा समावेश आहे. दिल्लीस्थित ट्रॅव्हल एजंट कलसी म्हणाले, 'माझा एक ग्राहक होता. भारतात भेटीची वेळ मिळू न शकल्याने त्याने रिओ डी जनेरियो (ब्राझील) येथे त्याचा H1B स्टँप लावला. खरेतर, गेल्या वर्षाच्या अखेरीस B1/B2 व्हिसासाठी प्रतीक्षा कालावधी 1000 दिवसांवर पोहोचला होता. यानंतर अमेरिकेने मुलाखतीची प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले.
अनिल कलसी म्हणाले की, ज्या भारतीयांना तातडीने अमेरिकेला जाण्याची गरज आहे ते अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अन्य देशांमध्ये जाऊ शकतात. कारण भारतात प्रतीक्षा यादी खूप मोठी आहे. प्रतीक्षा कालावधी 1000 दिवसांवर पोहोचला होता. त्यामुळे अमेरिकेच्या व्हिसासाठी अन्य देशाच्या दूतावासातून अर्ज करण्याची सूट देण्यात आली आहे. सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा