मुंबई अग्निशमनच्या ताफ्यात टर्नटेबल लँडर वाहन दाखल ; एकाचवेळी होणार १६ नागरिकांची सुटका | पुढारी

मुंबई अग्निशमनच्या ताफ्यात टर्नटेबल लँडर वाहन दाखल ; एकाचवेळी होणार १६ नागरिकांची सुटका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई महानगरपालिकेने अग्निशमन दलाची यंत्रणा अजून सक्षम करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. दलाच्या ताफ्यात जर्मन बनावटीच्या ६४ मीटर उंचीचे दोन टर्नटेबल लँडर वाहन दाखल झाले आहेत. या टर्नटेबल लॅडरला लिफ्टची सुविधा आहे. त्यामुळे आपत्कालीन काळात या टर्नटेबल लॅडरमुळे एकावेळी १६ नागरिकांची सुटका करणे शक्य होणार आहे.

देशात मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे नावलौकिक आहे. देशात तील कोणत्याही राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते. अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञानाने सुसज्ज असून यात अजून अत्याधुनिक यंत्रणा दाखल करण्यात येत आहेत. अग्निशमन दलात डिजिटल मोबाइल रेडिओ प्रणाली, आग विझविण्यासाठी रोबो व ९० मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर, आरटीक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट, अतिशीघ्र प्रतिसाद वाहने आणि श्वसन मास्क, जलद आग विझविण्याची प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड लँडर वाहने आहेत. आता यात जर्मन बनवतीच्या अत्याधुनिक ६४ मीटर उंचीचे दोन टर्नटेबल लॅडर वाहनांची भर पडणार आहे. हे टर्नटेबल लॅडर चालवण्याचे प्रशिक्षण नुकतेच जवानांना देण्यासाठी जर्मनीवरून खास तंत्रज्ञ आले आहेत.

मुंबई शहर व उपनगरात इमारतीच्या २१ मधल्या पर्यंत कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यात उदाहरणार्थ आग लागल्यास तेथे अग्निशमन जवानांना लिफ्टच्या सहाय्याने पोहचता येणार आहे. एवढेच नाही तर एकावेळी सोळा नागरिकांचा बचाव करता येणार आहे.

२१ कोटी रुपयाला खरेदी

दोन टर्नटेबल लॅडर २१ कोटी रुपयाला खरेदी करण्यात आले. यात पाच वर्षांचा देखभाल करार करण्यात आला. लवकरच वाहने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या janm टर्नटेबल लॅडर वाहनमध्ये स्ट्रेचर व व्हीलचेअर ठेवता येते. क्रेन म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. शिडीचा वापर लाइट टॉवर म्हणून करता येतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Back to top button