Latest

Urfi Javed : पातेली आणि चप्पलांचा ड्रेस कधी घालणार? : उर्फी जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अतरंगी उर्फी जावेद ( Urfi Javed ) नेहमीच तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तिचे अतरंगी कपडे सर्वात मोठा चर्चेचा विषय असतो. तिने केलेली फॅशन साेशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या तिने कपड्याचा ड्रेस नव्हे, तर चक्क काचेचा ड्रेस घातल्याने ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed ) हिच्‍या एअरपोर्ट लूकची देखील चर्चा होत असते. याच दरम्यान काही चाहत्यांना तिची फॅशन्स पसंतीस पडते. काही नेटकरी तिला जोरदार ट्रोल करतात. यामुळे तिचे इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. याचे खास सेलेब्रिशन करण्यासाठी उर्फीने पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत खास करून उर्फीची मैत्रीण आणि अभिनेत्री राखी सावंत पोहोचली आहे.

या पार्टीत उर्फीने कपड्याचा ड्रेस नव्हे तर चक्क टिकावू काचेपासून बनवण्यात आलेल्या ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस तिने पांढऱ्या रंगाच्या ब्रा आणि शार्ट स्कर्टवर परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये उर्फी खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. या पार्टीत राखी आणि उर्फीने धमाकेदार डान्स केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी टाकाऊ काचेच्या तुकड्यांनी बनवलेला ड्रेस घातला आहे. मला आश्चर्यकारक वाटत आहे. या ड्रेसमुळे मला चाहते वेडे ठरवणार आहेत; परंतु, आपण सगळे जण वेडे आहोत.' असे तिने म्हटले आहे. यासोबत तिने हा ड्रेस २० किलोच्या काचांपासून तयार केला असल्याचे सांगितले आहे.

हा ड्रेस घातलेला उर्फीचा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यासह बॉलिवूड कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात उर्फीची मैत्रीण राखी सावंतने या फोटोंवर रिप्लाय देताना खूपसाऱ्या ईमोजी शेअर केल्या आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावरील काही नेटकऱ्यांनी उर्फीचा हा लूक पसंतीस उतरला. तर काही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच घारेवर घरले आहे. यात एका युजर्सने 'पातेली आणि चप्पलांचा ड्रेस कधी घालणार?', 'आता कशी बसणार'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'तिला या ड्रेसमध्ये चालता येईल का?.'हिचे कपडे शिवतो कोण? असे प्रश्‍न तिला विचारले आहेत.

उर्फीने आतापर्यत 'दुर्गा', 'सात फेरों की हेराफेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'पंच बीट सीजन 2' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत काम केलं आहे.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani, photo: Urfi Javed instagram वरून साभार )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT