Latest

Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला अटक, दुबईत अश्लील ड्रेस घालून फिरणे पडले महागात

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Urfi Javed Arrest : आपल्या अतरंगी ड्रेसमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. उर्फी तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि वक्त्यव्यांमुळे कायम चर्चेत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. दरम्यान, उर्फी जावेद शुटींगसाठी दुबईत पोहचल्यानंतर तिच्या अडचणीत वाढ झाली. दुबईत सार्वजनिक ठिकाणी अश्लील ड्रेस घालणे तिला चांगलेच महागात पडले. तिला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. (Urfi Javed Arrest)

दुबईत पोलिसांनी घेतले ताब्यात (Urfi Javed Arrest)

उर्फी जावेद नुकतीच शूटींगसाठी दुबईत दाखल झाली होती. यादरम्यान, उर्फीने अश्लील ड्रेस परिधान करत सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता. दुबईत असे कपडे परिधान करत सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मनाई आहे. त्यामुळेच पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. (Urfi Javed Arrest)

सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट करणे पडले महागात

ईटाईम्स च्या रिपोर्टनुसार, उर्फीच्या परिधान केलेले कपडे आक्षेपार्ह नव्हते. मात्र, तिने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट केला होता. त्यामुळे दुबईतील अधिकाऱ्यांकडून तिची चौकशी केली जात आहे. रिपोर्टनुसार, उर्फीचे दुबईतील अधिकाऱ्यांनी भारतात परतण्याची तारिखही पुढे ढकलली आहे. (Urfi Javed Arrest)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT