Latest

सुनेला लैंगिक अत्‍याचारापासून वाचविण्‍यासाठी सासूने उचलले टोकाचे पाऊल, थेट पतीचा…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या १९ वर्षीय सुनेला लैंगिक अत्‍याचारापासून वाचवण्‍यासाठी सासूने थेट आपल्‍या पतीचा गळा चिरला. ही धक्‍कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं येथे घडली. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.

'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने स्‍थानिक पोलिसांच्‍या हवाल्‍याने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, तेजेंद्र सिंह ( वय ४३) हा आपल्‍या कुटुंबासह बिलसी शहरात राहत होता. तो खेळी तयार करण्‍याचे काम करत होता. १४ ऑगस्‍ट रोजी अंगणात झोपला असताना त्‍याची खून झाला. कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीने त्‍याचा खून केल्‍याचा दावा केला होता.

सूनेला लैंगिक अत्‍याचारापासून वाचविण्‍यासाठी सासूने पतीचा गळा चिरला

पोलीस तपासात तेजेंद्र सिंह याची पत्‍नी मिथलेशा वारंवार आपला जबाब बदलत असल्‍याचे निदर्शनास आले. अखेर तिने आपला गुन्‍हा कबुल केला. पती वारंवार मारहाण करत असे. मात्र सुनेवरही त्‍याची वाईट नजर होती. तो तिच्‍यावर शारीरिक संबंध ठेवण्‍यासाठी जबरदस्‍ती करत होता. १४ ऑगस्‍ट रोजी मद्यधुंद अवस्थेत तेजेंद्र सिंह घरी परतला. यावेळी तो अंगणातच झोपला. यावेळी पत्‍नीने त्‍याचा विळ्याने गळा चिरला. सुनेला लैंगिक अत्‍याचारापासून वाचविण्‍यासाठी हे कृत्‍य केल्‍याची तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी खुनाच्‍या गुन्‍ह्या खाली मिथलेशा हिला अटक केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT